वरमाळाच्या वेळी नवरदेवाचं कृत्य पाहून नववधूकडून लग्नाला नकार; पण का? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
नवऱ्याच्या वागण्याने आणि वधूच्या वृत्तीमुळे लग्नाचे वातावरण दुःखात बदलले.
मुंबई : उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे वरमाला घालण्याच्या वेळी असे काही घडले की नववधून थेट लग्न करण्यास नकार दिला. लोकांनी नववधूला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु ती ऐकायला तयार नव्हती. वधूच्या या वृत्तीमुळे वधू पक्षात तसेच वरातींमध्ये गोंधळ उडाला आणि सगळ्यांना हा प्रश्न पडला आहे की, नक्की असं काय घडलं आहे की नववधूने एवढा मोठा निर्णय घेतला आणि लग्नास नकार दिला.
खरेतर चांगले कुटुंब मिळाल्याने वधू-वर पक्षातील लोकांना खूप आनंद झाला होता, परंतु नवऱ्याच्या वागण्याने आणि वधूच्या वृत्तीमुळे लग्नाचे वातावरण दुःखात बदलले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विचित्र प्रकरण औरैया जिल्ह्यातील बिधुना कोतवाली येथील आहे. ही घटना समोर आल्यानंतर लोकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
खरेतर सगळं काही सुरळीत सुरु असताना, भरमंडपात वरमाळाच्या वेळी नवर देवाला कोणत्या तरी गोष्टीवरुन राग आला. ज्यामुळे त्याने आपल्या हातातील हार फेकून दिला. नवरदेवाचे हे कृत्य पाहून वधू चांगलीच संतापली आणि यानंतर वधूने लग्नास नकार दिला. परंतु वधूने लग्नास नकार दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली.
यानंतर वधूचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले, मात्र वधू आपल्या निर्णयावर डगमगली नाही. खरेतर नववधू आपल्या भावी जोडीदाराच्या या कृतीमुळे खूप संतापली आहे. नववधूचे म्हणणे आहे की, हा मुलगा विचित्र वागतो, त्यामुळे मी लग्न करणार नाही.
काय आहे वराची बाजू?
या घटनेबद्दल नवरदेव आकाशशी बोलले असता त्याने सांगितले की, त्याने हार फेकला नाही. हा वाद जेवणावरुन झाला. जेव्हा तो तो जेवायला गेला होता तेव्हा त्याने तिथे जेवताना नेग मागितला होता, जो दिला गेला नाही. ज्यानंतर नववधूने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.
जर नवऱ्याच्या वक्तव्यावर विश्वास ठेवला तर पैसे दिले नाही म्हणून नववधूने हे लग्न तोडलं असल्याचे समोर येत आहे. तसेच नववधूच्या वक्तव्यावर विश्वास ठेवला तर हे लग्न नवरदेवाच्या हार फेकण्यामुळे मोडला आहे. परंतु या घटनेमागील सत्य नक्की काय हे अद्याप समोर आलेलं नाही.