शिंकला आणि खाली पडला, परत उठलाच नाही... सीसीट्वीह कैद झाला मृत्यूचा Live Video
मित्रांबरोबर रस्त्याने चालत असताना तरुणाला शिंक आली आणि तो कोसळला, मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण... अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
Hearth Attack News : हार्ट अटॅक आल्याने अचानक मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली. रस्त्यावरुन मित्रांबरोबर चालत असताना एका तरुणाला शिंक आली, पण काही सेकंदातच तो खाली कोसळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अचानक शिंक आल्यानंतर त्या मुलाला हार्ट अटॅक आला आणि त्याने जागीच जीव सोडला. मेरठमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये?
मृत्यूचा हा लाईव्ह थरार रस्त्यावरच्या एका सीसीटीव्हीत कैद झाला आहे. चार तरुण रस्त्यावरुन गप्पा मारत चालत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. सर्वजण एकमेकांच्या खांद्यावर हात ठेऊन चालत आहेत. त्याचवेळी चारमधल्या एका तरुणाला शिंक येते. शिंक आल्यानंतर त्या तरुणाच्या घशात काही तरी झाल्याचं दिसत असून तो आपला गळा पकडतो. त्याच अवस्थेत काही पावलं चालत नाही तोच तो तरुण अचानक रस्त्यावर कोसळतो.
मित्रांनी केला वाचवण्याचा प्रयत्न
अचानक घडलेल्या या घटनेनं इतर तीन मित्र काहीसे गोंधळले. मित्र अचानक जमिनीवर कोसळल्याने इतर तिघांनी त्याला तात्काळ उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्या तरुणाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने मित्रांनी घाबरुन आरडा-ओरडा सुरु केला. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील लोकं घरातून बाहेर आले. परिसरातील लोकांच्या मदतीने मित्रांनी त्या तरुणाला रुग्णालयात नेलं, पण उपचारापूर्वीच त्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला होता.
2 डिसेंबरच्या रात्रीची घटना
ही दुर्देवी घटना 2 डिसेंबरच्या रात्री 10.30 वाजता घडली. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण काही दिवसांपासून आजारी होता. त्यातच त्याला हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत तरुणाचं नाव जुबेर असल्याचं समोर आलं आहे.
class="twitter-tweet">
छींक आई और वो मर गया...सीसीटीवी में क़ैद हुई लाइव मौत #ViralVideo pic.twitter.com/KOcDIKXaoz
— Zee News (@ZeeNews) December 4, 2022
वरमाला घालताना वधूचा मृत्यू
लखनऊमध्ये अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. 20 वर्षांची वधू वराला वरमाला घालताना अचानक कोसळली. तिचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना लखनऊमधल्या महिलाबाद इतल्या भदगावमधील आहे. काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेशमधल्या कटनी इतं साई बाबांच्या मंदिरात डोकं टेकवण्यासाठी आलेल्या एका भाविकाचा मंदिराच्या पायऱ्यांवरच हार्ट अटॅकने मृत्यू झाला.