substance Abuse : असं म्हटलं जातं की, देशातील तरुण पिढी हीच भविष्यात एक चांगलं राष्ट्र घडवण्यासाठी योगदान देत असते. पण, भारतात मात्र परिस्थिती काहीशी चिंतेत टाकणारी आहे. कारण, भारतातील तरुण पिढीचा कल हा सध्या उज्ज्वल भवितव्यापेक्षा व्यसनांकडेच सर्वाधिक असल्याचं दिसून येत आहे. निमित्त ठरत आहे, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयापुढे केंद्र सरकारनं दिलेली माहिती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात 10 ते 17 वर्षे वयोगटीतली दीड कोटी मुलं व्यसनाधीन असल्याची माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिली. या मुलांना विविध प्रकारची व्यसनं असल्याची धक्कादायक माहिती केंद्रानं दिली. भारतीयांकडून नशेसाठी मद्याद्वारे अल्कोहोल सर्वाधिक वापरलं जातं. अहवालानुसार साधारण 16 कोटी भारतीय मद्यसेवन करतात. (shocking report revealed more than 1 crore of youth addicted to alcohol and drugs substance abuse in india)


हेसुद्धा वाचा : वाईन, व्हिस्की, वोडका, बिअर, ब्रँडी, रम... या सर्वांमध्ये फरक काय? जाणून घ्या


जवळपास पाच कोटींपेक्षा जास्त नागरिक मद्याच्या आहारी गेले असून त्यांना तातडीनं मदतीची आवश्यकता आहे. तर तीन कोटी एक लाख भारतीय गांजा किंवा त्यापासून बनवलेल्या अंमली पदार्थांचं सेवन करतात असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. ही आकडेवारी इतक्यावरच थांबत नाही, तर देशात दोन कोटी 26 लाख नागरिक अफूचे सेवन करतात. सदर आकडेवारी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केंद्राने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. 


केंद्राच्या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे? 


- 10 ते 17 वयोगटातील 1.5 कोटी मुलांना व्यसनं 
- 16 कोटी नागरिक मद्याच्या आहारी
- त्रिपुरा, पंजाब, गोवा इथं सर्वाधिक मद्यप्राशन 
- गांजा घेणाऱ्यांचा आकडा 3 कोटींवर 
- 2.26 लाख नागरिकांना अफूच्या सेवनाची सवय, त्यातही अधिकांना मदतीची गरज