धक्कादायक! ५६% कॅब ड्रायव्हर्स दारुच्या नशेत चालवतात गाड्या
तुम्ही प्रवास करण्यासाठी कॅबचा वापर करता? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे.
नवी दिल्ली : तुम्ही प्रवास करण्यासाठी कॅबचा वापर करता? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे.
कॅबमधून प्रवास करणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी
दिल्ली-एनसीआरमध्ये कॅबमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये तब्बल ५६% कॅब ड्रायव्हर दारु पिऊन गाडी चालवत असल्याची माहिती एका सर्वेक्षणात समोर आली आहे.
CADDच्या सर्व्हेक्षणात आली माहिती समोर
कम्यूनिटी अगेन्स्ट ड्रंकन ड्राईव्हने या संदर्भात एक सर्वेक्षण केलं. यामध्ये समोर आलं की, दिल्ली-एनसीआरमध्ये ड्रायव्हर दारुच्या नशेत गाडी चालवतात. यापैकी अनेक ड्रायव्हर हे दारु प्यायल्याशिवाय गाडीच चालवू शकत नाही अशीही माहिती समोर आलीय.
नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन
धक्कादायक म्हणजे कॅब कंपन्याही आपल्या ९०% ड्रायव्हर्सची तपासणीच करत नाही. CADDने कॅबच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. तसेच या सर्व्हेक्षणात दिल्ली-एनसीआरमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.
५६% कॅब ड्रायव्हर दारु पिऊन गाडी चालवतात
कम्यूनिटी अगेन्स्ट ड्रंकन ड्राईव्ह (CADD) ने केलेल्या सर्व्हेक्षणात समोर आलं आहे की, ५६% कॅब ड्रायव्हर दारु पिऊन गाडी चालवतात. यापैकी २७% कॅब ड्रायव्हर दारुच्या नशेतच बुकिंग घेतात. तर, ६२% कॅब ड्रायव्हर ड्युटी चालु असतानाच गाडीत दारु पितात. १० सप्टेंबर ते १० डिसेंबर दरम्यान दिल्ली-एनसीआरमध्ये जवळपास १०,००० कॅब ड्रायव्हर्सवर CADD ने सर्वे केला होता.
या सर्व्हेदरम्यान CADDने १० हजार ड्रायव्हर्सवर हा सर्वे केला. यापैकी रेडिओ टॅक्सीच्या ९,१०७ ड्रायव्हर्सला प्रश्न विचारण्यात आले. तर, ८९३ कॅब ड्रायव्हर्स हे काळी-पिवळी गाड्यांचे होते. हा सर्वे एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, मॉल, मेट्रो स्टेशन आणि युनिवर्सिटी परिसरात केला आहे.