मुंबई : इंटरनेटवर कधी आपल्याला काय पाहायला मिळेल याचा काही नेम नाही. हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्या दिवसालाच नव्हे तर तासाला काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. जे आपल्याला माहिती पुरवण्यासोबतच मनोरंजन देखील करतं. सध्या असाच एक व्हिडीओ आपल्या समोर आला आहे. जो पाहून लोकांना आश्चर्य वाटू लागलं आहे. हो हा व्हिडीओच तसा आहे. या व्हिडीओमध्ये जवळ-जवळ 14 गाड्या पाण्यात पोहोताना दिसत आहेत. हे असं का घडलं? किंवा कोणी ते मुद्दम केलं का? हा मोठा प्रश्न उपस्थीत राहातो. आम्ही तुम्हाला या व्हिडीओबद्दल माहिती देणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील आहे. येथे जंगलात पावसाचा अचानक जोर वाढल्याने किमान 14 गाड्या वाहून गेल्या, यामध्ये 50 लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पळ काढला.


अतिरिक्त पोलिस अधीक्षक जितेंद्र सिंह पवार यांनी सांगितले की, इंदूर जिल्ह्यातील सर्व लोक रविवारी संध्याकाळी बलवारा पोलिस स्टेशन हद्दीतील कटकूट जंगलात सुकरी नदीजवळ सहलीचा आनंद लुटत होते. परिसरात पावसाने ओढ दिल्याने नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली.


येथे फिरायला आलेल्या लोकांनी त्यांच्या कार तिथेच ठेवल्या आणि स्वतःला वाचवण्यासाठी जंगलात उंच ठिकाणी गेले. काही एसयूव्हीसह किमान 14 कार पाण्यात वाहून गेल्याचे समोर आले आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक ग्रामस्थांकडून ट्रॅक्टरच्या मदतीने 10 कार आणि एसयूव्ही बाहेर काढल्या.



परंतु तांत्रिक बिघाडामुळे गाड्या सुरू होऊ शकल्या नाहीत, कारण वाहनांमध्ये पाणी शिरले होते. ज्यानंतर या लोकांना इतर वाहनांतून त्यांच्या घरी पाठवण्यात आले.


अधिकाऱ्यांनी सांगितले की, 10 कार बाहेर काढलं गेलं, परंतु इतर तीन कार वाहून गेल्या, तर एक पुलाच्या खांब्याजवळ अडकली आहे.