Shocking Video : जत्रेत तुम्ही पाळण्यात बसणार असाल तर हा व्हिडिओ नक्की पाहा. छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (Shocking Video of Accident) जत्रेतला झुला दिसतोय. हा झुला मोठ्या नावेसारखा दिसतोय. झुल्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक बसले आहेत. त्यात आणखी मुर्खपणाचा कळस, झुला ओव्हरलोड झाल्यानं लोक उभे राहिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन तीन वेळा झुला झुलल्यानंतर उभे असलेल्यांचा बॅलन्स बिघडला आणि चौघेजण धाडकन खाली कोसळले. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना घडली आहे. झुला झुलत असताना 4 जण खाली कोसळले. चौघे खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले आहेत.


आणखी वाचा - Trending Video: देव तारी त्याला कोण मारी! रेल्वे ट्रॅक ओलांडताना अचानक आली ट्रेन अन्...


पाहा व्हिडीओ- 



नशीब बलवत्तर म्हणून मोठ्या संकटातून हे थोडक्यात बचावले. नाहीतर इथे मोठा अनर्थ घडला असता. या झुल्याच्या मालकाने जास्त पैसे कमावण्याच्या नादात क्षमतेपेक्षा जास्त लोकांना झुल्यात बसवलं. पण, अशी चूक झुल्यात बसणाऱ्यांच्या जीवावर बेतू शकते.त्यामुळे तुम्ही जर जत्रेत झुल्यात बसणार असाल तर काळजी घेणं गरजेचं आहे.