मुंबई : सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे दिसतो. आता नोएडामधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक महिला ई-रिक्षा चालकाला मारहाण करताना दिसली. या धक्कादायक व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु आहे. 


आणखी वाचा : राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, डॉक्टरांकडून मोठी अपडेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोएडा पोलिसांनी शनिवारी एका महिलेला सार्वजनिकरित्या ई-रिक्षा चालकाला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. किरण सिंग असे आरोपी महिलेचे नाव असून ती नोएडा येथील रहिवासी आहे. ही महिला मूळची आग्रा येथील रहिवासी आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने आयएएनएसला सांगितले की, सिंग या रिक्षा चालकाच्या ई-रिक्षा आणि वॅगन कारमध्ये झालेल्या किरकोळ अपघातानंतर ही घटना घडली.


आणखी वाचा : 'ज्या चित्रपटात शाहरुख खान तो फ्लॉपच', सलमानच्या चाहत्यांचा Shahrukh ला विरोध



आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर


अधिकाऱ्यानी सांगितले की, 'महिला कारमधून खाली उतरली आणि ई-रिक्षा चालकाला अनेक वेळा चापट मारली.' व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी महिला केवळ 90 सेकंदात किमान 17 वेळा ई-रिक्षा चालकाला कानशिलात मारताना दिसत आहे.


आणखी वाचा : सुझानला बॉयफ्रेंडसोबत अशा अवस्थेत पाहिल्यानंतर ट्रोलर्स म्हणाले, 'याच्यापेक्षा हृतिक लाखपट...


ही महिला ई-रिक्षा चालकाला त्याच्या कॉलरने पकडून तिच्या गाडीवर असलेल्या स्क्रॅच  कारवरील जखमांच्या खुणा दाखवताना दिसत आहे. पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आलं आहे.