नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगातील एक पॉवरफुल इंडियन लीडर म्हणून नावारुपाला येत आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर लगेच मोदींनी परदेश दौरा सुरु केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची आपले स्थान मजबुत करण्यासाठी मोदी हे करत असल्याचे बोलले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. यातनिमित्ताने  Rickshawali या नावाच्या यू-ट्यूब चॅनेलने एक व्हिडिओ अपलोड केलाय. हा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. पाच दिवसांत या व्हिडिओला ५ लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाल्या आहेत. या व्हिडिओतील अॅंकर आहे ती स्पेनच्या इसीबा द्वीपसमूहावर गेली. तेथे तिने मोदी यांची प्रतिमा घेऊन ही व्यक्ती कोण, तुम्ही ओळखता का,  यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? आदी प्रश्न विचारले. यावेळी आश्चर्यकारक उत्तर मिळालीत.



योगा दिवसाबद्दल आभार


एका स्पेनच्या मुलीने नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा पॉवरफुल असल्याचे म्हटले. स्वत: योगा शिक्षक असे सांगणाऱ्या महिलेने नरेंद्र मोदी यांना आंतराष्ट्रीय योगा दिवस सुरु केल्याबद्दल धन्यवाद दिलेत.


खास पॉवरफुल व्यक्ती


अनेक लोकांनी योगा दिवसाची तारीख २१ जून लक्षात असल्याचे सांगितले. त्यांनी योगाची स्टेप करुन दाखवली. नोदी यांची प्रतिमा पाहून सांगितले, ते पॉवरफुल व्यक्ती आहेत.


मोदींचा नारा ऐकवला


एका व्यक्तीने चक्क नरेंद्र मोदी यांची घोषणाही ऐकवली. 'हर- हर मोदी, घर-घर मोदी' ही घोषणा त्याला माहिती होती. लोकांची उत्तर ऐकूण रिक्षावाली आश्चर्यचकीत झाली. तसेच एकाने मोदींचा फोटो पाहून म्हटले गांधी आहेत.