मुंबई : दररोज एकाच वेळी ऑफिसला जावं लागत असल्यामुळे फक्त तुम्हीच नाही तर जगातील प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे. त्यांच म्हणणं आहे की, एकाच वेळी ऑफिसला जाणं येणं केल्यामुळे बोरिंग होत आहे. ऑफिस जाण्यापेक्षा 9 ते 5 या वेळेत ऑफिसला जाणं यामुळे खूप कंटाळा येत असल्याचा खुलासा ब्रिटनच्या एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे. सर्वेतून असं समोर आलं आहे की, 9 ते 5 या वेळेत कामाला जाण्यासाठी लोकं तयार नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाचवेळेत नोकरी करायला लागल्यामुळे लोकं आता दुसऱ्या नोकऱ्यांच्या शोधात आहे. जिथे आपल्यावेळेनुसार कामाला जाता येणार आहे. हा सर्व्हे यू-जीओवी नावात्या संस्थेने केला असून देशातील 5 हजार कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आहे. सर्व्हेनुसार, लोकं 8 तास काम करायला अजिबात कंटाळत नाहीत मात्र रोज एकाच वेळेत कामाला जाणं त्यांना पसंद नाही. फक्त 6% असे लोक आहेत ज्यांना या वेळेने काही हरकत नाही. ब्रिटनमध्ये 9 ते 5 वेळ ही आदर्श वेळ मानली जात आहे. 


8 ते 4 ही वेळ लोकांना पसंद 


सर्व्हेत समोर आलेल्या गोष्टीनुसार 37 टक्के लोकांना 8 ते 4 ही वेळ खूप आवडते. तर 21 टक्के लोकांना सकाळी 7 ते दुपारी 3 ही वेळ अतिशय आवडत नाही. 10 टक्के लोकांना 9 ते 5 ही वेळ लोकांना पसंद आहे. 8 टक्के लोकांना ऑफिसमध्ये 9 वाजता पोहोचण्यास काही हरकत नाही.