Awareness Video: प्रत्येक लहान मुलीच्या आईने (mother) बघावा असा हा व्हिडीओ आहे. सध्या सोशल मीडियावर (Social media) हा व्हिडीओ (Video) मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे. तुम्हाला लहान मुली असो, किंवा एक बहिण प्रत्येक महिलेने बघावा असा हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर आपल्यावर अनेक धक्कादायक घटनेचे व्हिडीओ पाहिला मिळतात. हे व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो. पण हा व्हिडीओ पाहून तुमचा तळमस्तकातील आग डोक्यात जाईल. 


विकृतीचा कळस!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका दुकानात लहान मुलगी (girl) काही वस्तू घेण्यासाठी येते. पण तिथे असलेला एक व्यक्ती त्या लहान मुलीला वस्तू दाखविण्याचा बहाण्याने हात लावतो. ती लहान मुलगी घाबरते आणि तिथून निघून जाते. (shopkeeper harrasing girl and women viral video on social media nmp)



विकृतीचा विषाणू!संतापजनक कृत्य


या नराधम दुकानदारचं (shopkeeper) कृत्य पाहून नेटकरी संतापलेले आहेत. या नराधम इथेच थांबला नाही. या दुकानात येत असलेल्या प्रत्येक तरुण मुलगी असो वा महिलेला तो वस्तू दाखविण्याच्या बहाण्याने स्पर्श करतो.


धक्कादायक व्हिडीओ 



नराधमाला पोलिसाचा चाप


या व्हिडीओमध्ये पुढे तुम्ही पाहू शकता, अचानक त्या दुकानात एक पोलीस (Police) अधिकारी येतो. पोलिसांना पाहून या दुकानदाराची हवा गुल होते. तो पोलीस अधिकारी दुकानात आलेल्या महिलेचा नातेवाईक असतो. ती महिला (women) झालेला सगळ्या प्रकार सांगते. पोलीस अधिकारी त्या नराधमाला चांगली अद्दल घडवतो. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या यूट्यूब चॅनेलवर Social Awareness साठी टाकण्यात आला आहे. जर आयुष्यात तुमच्यासोबत असं काही होत असेल किंवा असं काही कोणासोबत होताना तुम्हाला दिसलं तर लगेचच त्याबद्दल आवाज उठवा. पोलिसांकडे तक्रार करा.