रेल्वेचं तिकीट आता उधारीत मिळणार ...रेल्वेचं `आज उधार, कल नगद`
पैसे नसल्याने अनेकदा फिरायला जाण्याच्या प्लॅनवर पाणी सोडावं लागतं. मात्र आता तसं काही करण्याची गरज नाही. आता पैसे नसताना मोफत प्रवास करता येणार आहे.
मुंबई : दूरच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिलं जातं. सुखकर आणि खिशाला परवडणारा प्रवास असल्याने अनेक जण रेल्वेनेच बाहेरगावी प्रवास करतात. रेल्वे प्रशासनही प्रवास सुखकर व्हावा,यासाठी नवनवीन सुविधा देत असतं. (shopping and book indian railway tickets with to buy now pay later know rule and advantage what is bnpl)
पैसे नसल्याने अनेकदा फिरायला जाण्याच्या प्लॅनवर पाणी सोडावं लागतं. मात्र आता तसं काही करण्याची गरज नाही. आता पैशे नसताना मोफत प्रवास करता येणार आहे. खिशात रुपया नसतानाही आता तुम्हाला तिकीट आरक्षित करता येणार आहे. तसेच शॉपिंगही करता येणार आहे.
देशात बाय नाऊ पे लेटर (Buy Now Pay Later) या योजनेला सर्वसामांन्याकडून जोरदार प्रतिसाद मिळतोय. शॉपिंग आणि प्रवासाची आवड असणाऱ्यांकडून या योजनेला भरभरून प्रतिसाद देत आहेत.
रिपोर्टनुसार, भारतात 2026 पर्यंत BNPL च्या बाजरपेठेचं विस्तार होईल अन ते 45-50 अरब डॉलर इतकी उलाढाल होईल. सध्या बीएनपीएलची उलाढाल ही 3 ते 3.5 अरब डॉलर इतकी आहे.
'बाय नाऊ पे लेटर' नुसार, कंपन्या शॉपिंग करण्यासाठी कर्ज देते. ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाहीये, त्यांच्यासाठी हा पर्याय सर्वोत्तम आहे. या स्कीमनुसार पेमेंट कसं करायचं हे जाणून घेऊयात.
'बाय नाऊ पे लेटर'चं वैशिष्ट्य
-पैशांविना खरेदी करु शकतो.
-'बाय नाऊ पे लेटर'च्या माध्यामातून इ कॉमर्स वेबसाईटवरुन शॉपिंग करता येते.
-कमी कालावधीसाठी हे कर्ज आहे.
-क्रेडिट कार्डचा पर्याय हा क्रेडिट कार्डच्या तुलनेत कमी व्याज दराने कर्ज देतं.
- एकूण खरेदीच्या रक्कमेचा एक छोटा हिस्सा डाऊन पेमेंट म्हणून द्यावं लागेल.
- कमी कालावधीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र एका ठराविक कालावधीनंतर व्याज भरावा लागतो.
- तुम्हाली एकरकमी किंवा हफ्त्यांमध्येही कर्ज फेडू शकता.
- शॉपिंगनंतरच्या 14 ते 20 दिवसांमध्ये तुम्हाला खर्च केलेली रक्कम भरावी लागेल.
- वेळेत रक्कम न भरल्यास तुम्हाला एकूम रक्कमेच्या 24 टक्के रक्कम व्याज म्हणून द्यावी लागेल.