`कृषीप्रधान भारतात २०५० पर्यंत धान्याचा तुटवडा`
भारतासाठी ही धोक्याची घंटा
नवी दिल्ली : भारत हा कृषीप्रधान देश असला तरी २०५० पर्यंत धान्याचा तुटवडा जाणवेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. वर्ल्ड अॅटलस ऑफ डेजर्टीफिकेशनने दिलेल्या अहवालानुसार प्रदुषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे जमिनीचा कस आणि दुष्काळासारख्या स्थितीला येत्या काही काळात सामोरं जावं लागणार आहे. परिस्थिती अशीच राहिली तर पृथ्वीच्या निम्म्याहून अधिक जमिनीची गुणवत्ता संपून जाईल आणि त्याचा विपरित परिणाम अन्नधान्य उत्पादनावर होईल अशी नोंद अहवालात करण्यात आली आहे.