नवी दिल्ली : आपण आपल्या परिवाराच्या आनंदासाठी काय नाही करत. होम लोन घेऊन घर खरेदी करतो. ऑटो लोन घेऊन कार किंवा इतर वाहनं घेतो. छोटे मोठे लोन घेऊन आपण परिवाराच्या सुखासाठी सर्व प्रयत्न करतो. कोरोना काळात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. परंतु अशा लोकांवर कर्ज असतील तर ते नंतर वसूल कोणाकडून होते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यासाठी पुढे वाचा  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जदाराच्या मृत्यू नंतर कर्ज कोणी भरावे ?
कर्जदाराच्या मृत्यूनंतर कर्ज कोणी भरावे याचे उत्तर जाणून घेण्याआधी हे समजने गरजेचे आहे की, कर्ज एका प्रकारचे नसते. कर्जाला सेक्युरटी आणि अनसेक्युरटी अशा कॅटेगिरीमध्ये ठेवले जाते. सेक्युअर्ड लोन म्हणजेच होम लोन, ऑटो लोन आणि अनसेक्युअर्ड लोन म्हणजेच पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड वगैरे 


होम लोन
जर संयुक्त होम लोन काढण्यात आले आहे. आणि प्रायमरी अर्जदाराचा मृत्यू झाला असेल तर, उर्वरित लोन भरण्याची जबाबदारी दुसऱ्या अर्जदाराची असते. जर दुसरा अर्जदारही लोन भरू न शकल्यास. बँकांना दिवाणी न्यायालय, डेट रिकवरी ट्रीब्युनलनुसार वसूली करण्याचा अधिकार असतो. अशात बँका मृताच्या कुटूंबियांना लोन भरण्यासाठी काही दिवसांचा कालावधी देऊ शकतात. मृत व्यक्तीने कोणतीही टर्म पॉलिसी घेतली असेल तर, त्या पैशातून लोनची रक्कम भरता येऊ शकते.


ऑटो लोन
एखादी कार किंवा वाहनावर लोन घेतलेल्या व्यक्तीचा  मृत्यू झाल्यास, त्याचे उर्वरित लोन भरण्याची जबाबदारी कुटूंबाची असते. बँक कुटूंबातील सदस्यांना उर्वरित लोन भरण्यास सांगू शकते. जर परिवारातील कोणताही सदस्य लोन भरण्यास तयार नसेल तर बँक संबधित वाहन जप्त करू शकते. संबधित वाहनाच्या लिलावातून बँक कर्ज वसूल करते.


पर्सनल लोन , क्रेडिट कार्ड
पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डचे बिल हे सर्व अनसेक्युअर्ड लोन असतात. जर कोणत्याही अशा कर्जदार व्यक्तीचा मृ्त्यू झाला. तर बँक मृतकाच्या कुटूंबाला लोन भरण्याचे सांगू शकत नाही. कारण हे अनसेक्युअर्ड लोन असते. या लोनला तारणही काहीही नसते त्यामुळे कसलीही संपत्ती जप्त करता येत नाही. बँक या कर्जाला राइट ऑफ करते म्हणजेच NPA मध्ये वर्ग करते.