Shraddha Murder Case: वसईतील 26 वर्षीय श्रद्धा वालकर हिच्या हत्याप्रकरणात प्रत्येक वेळी नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. श्रद्धा वालकर (Shraddha Murder Case) ही दिल्लीच्या मेहरौली येथे आफताब अमीन पूनावाला (aftab amin poonawalla) या तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. 18 मे 2022 रोजी आफताबने श्रद्धाची हत्या केली होती. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून मेहरौलीच्या जंगलात फेकले होते. श्रद्धाच्या (Shraddha Walker) हत्येला अनेक महिने उलटून गेल्यामुळे पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाचा माग काढणे अवघड होऊन बसले आहे. त्यानंतर आता श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर येतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली पोलीस श्रद्धाच्या मोबाईलचाही शोध घेण्याचा  प्रयत्न


श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Murder Case) प्रकरणात मोठी अपडेट समोर येतेय. दिल्ली पोलीस आता आफताबच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. लवकरच त्यासाठी आफताबच्या कुटुंबियांशी संपर्क साधणार असल्याची माहिती आहे. दिल्ली पोलीस श्रद्धाच्या मोबाईलचाही शोध घेतायत. श्रद्धाचा मोबाईल सापडल्यास त्यातून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत श्रद्धाच्या अनेक मित्र-मैत्रिणींचे जबाब नोंदवले आहेत. शिवानी म्हात्रे, लक्ष्मण नादर, राहुल राय, श्रद्धाच्या कंपनीचा मॅनेजर यांचे जबाब पोलिसांनी घेतलेत.  


दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा आफताबने पोलिसांना सांगितले होते की, 22 मे रोजी भांडण झाल्यानंतर श्रद्धा घरातून निघून गेली होती (18 मे रोजी श्रद्धाची हत्या झाली होती). त्याने सांगितले की तिने फक्त तिचा फोन तिच्याजवळ ठेवला होता आणि तिचे सामान त्याच्या फ्लॅटवर सोडले होते. मात्र, पोलिसांनी त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि त्यांचे लोकेशन ट्रेस केले तेव्हा सत्य समोर आले. 


वाचा : FIFA world cup 2022 मधील टॉप 5 संघ; तुमचा आवडता संघ कोणता? 


असा सापडला पोलिसांच्या कचाट्यात


मिळालेल्या माहितीनुसार, आफताबचं पितळ उघडं पडलं, त्याने आधी सांगितले होते की 22 मे नंतर श्रद्धा संपर्कात नाही. 26 मे रोजी झालेल्या बँक ट्रान्सफरचे ठिकाणही मेहरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासात सहभागी असलेले पोलीस अधिकारी सचिन सानप यांनी आफताबला विचारले की, त्यानंतर तू तिला पुन्हा कधी भेटलास? तर आफताबने उत्तर दिले की श्रद्धा १२ जून रोजी तिचे कपडे घेण्यासाठी परत आली होती. तेव्हा अधिकाऱ्याने विचारले की श्रद्धाने तिचा फोन नेला होता का? 


सचिन सानप यांनी आफताबला सांगितले की, श्रद्धाचं फोन लोकेशन 26 मे पर्यंत तुझ्या छत्तरपूर येथील घरी दिसत आहे. मग तिने फोन घेतला होता तर तिचे लोकेशन घरचं का दाखवत आहे आणि जर तिने मोबाईल घरीच ठेवला तर तो कधीच घरातून बाहेर निघाला नाही? त्यानंतर सचिन सानप त्याला म्हणाले, मित्रा तू आता फसला आहेस, तुझा गुन्हा मान्य कर नाहीतर आता तू मरशील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.