Sahibganj Murder Case: धक्कादायक, या ठिकाणी श्रद्धा हत्याकांड पार्ट-2, पत्नीची हत्या करुन केले 12 तुकडे
Jharkhand Crime News: एक धक्कादायक माहिती पुढे आलेय. महिलेच्या हत्येचा आरोप असलेला तिचा पती दिलदार अन्सारी (Dildar Ansari) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने 10-15 दिवसांपूर्वी हत्या करण्यात आलेल्या महिलेशी लग्न केले होते.
Sahibganj Killing: देशाला हादवरणारी आणखी एक घटना घडली आहे. (Crime News) श्रद्धा हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे. झारखंडमधील साहिबगंजमधून ही हृदयपिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. दिलदार अन्सारी (Dildar Ansari) नावाच्या व्यक्तीने आपल्याच पत्नीची हत्या केली. तो एवढ्यावर न थांबता त्याने तिचे 12 तुकडे केलेत.
पीडितेच्या कुटुंबीयांकडून आरोप
पीडितेच्या कुटुंबीयांकडून आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिलदार अन्सारी (Dildar Ansari)याने पत्नीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर मृतदेहाचे 12 तुकडे केले. पोलिसांनी आरोपी पती दिलदार अन्सारी याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सरु आहे. दिलदार अन्सारीने त्याच्या दुसऱ्या पत्नीचा खून केल्याचा आरोप आहे.
10-15 दिवसांपूर्वी झाले होते लग्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रबिता पहाडीन असे मृत महिलेचे नाव आहे. ती आदिवासी समाजातील होती. दिलदार अन्सारी याने 10-15 दिवसांपूर्वी रबितासोबत लग्न केले होते. लग्नानंतर आरोपीने रबिताला आपली दुसरी पत्नी बनवले होते. आरोपी दिलदार अन्सारी आणि रबिता यांचे अनेक वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरु होते. शुक्रवारी रात्री आरोपींनी हा निर्घृण खून केल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपीच्या मामाच्या घरातून शस्त्र जप्त
विशेष म्हणजे शनिवारी सायंकाळी बोरीओ संथाली परिसरातील अंगणवाडी केंद्राच्या इमारतीच्या पाठीमागे मानवी पायाचा तुकडा सापडला होता, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तपास सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले. यानंतर आरोपी दिलदार अन्सारीच्या सर्व नातेवाईकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. त्यानंतर आरोपीचे मामा मोहं. मोईनुल अन्सारीच्या घरातून हत्येत वापरलेली दोन धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मुख्य आरोपी मोहम्मद. मोईनुल अन्सारी हा घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
एसपी यांनी दिली ही माहिती
साहिबगंजच्या एसपींनी सांगितले की, आदिवासी समाजातील 22 वर्षीय महिलेच्या मृतदेहाचे 12 तुकडे सापडले आहेत. मृतदेहाचे काही भाग अद्याप सापडलेले नाहीत. त्याचा शोध सुरूच आहे. मृत महिलेचा पती दिलदार अन्सारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत महिला ही त्याची दुसरी पत्नी होती, अशी पोलिसांनी माहिती दिली.