Shraddha Murder Case : मोठी बातमी! उद्या आफताबची सुटका? कोर्टाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष
#shraddhamurdercase : श्रद्धा खून प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याने दिल्लीतील साकेत न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे.
Shraddha Murder Case : देशभरात श्रद्धा वालकर हत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. दिल्लीच्या श्रद्धा वायकरचा तिचा प्रियकर आफताब पुनावालाने गळा दाबून खून करत 35 तुकडे करुन त्याने फ्रिजमध्ये ठेवले होते.या हत्येनंतर रोज नवनव्या खुलासे दिल्ली पोलिसांना सापडत आहे. याच दरम्यान आफताबच्या जामीन अर्जावर उद्या (17 डिसेंबर) सुनावणी होणार आहे.
दिल्लीच्या श्रध्दा वालकर (Shraddha Walkar) हत्येप्रकरणी रोज नवनवे अपडेट समोर येत असतानाच काल (15 डिसेंबर) पोलिसांच्या हाती एक महत्वाचा पुरावा (evidence) लागला आहे. आरोपी आफताब पुनावालाने श्रद्धाचे तुकडे करून जंगलात फेकल्याचे पोलिसांना सांगितले होते. ज्यामधील काही हाडे पोलिसांच्या लागली होती. मात्र ही हाडे श्रद्धाचे असल्याचे डीएनए रिपोर्टमधून समोर आले आहे. दरम्यान, आफताबने नार्को आणि पॉलिग्राफ टेस्टमध्ये आपला गुन्हा कबूल केला आहे. असे असताना श्रद्धा खून प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याने दिल्लीतील साकेत न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे. पोलिसांच्या चौकशीसाठी तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या जामीन अर्जावर उद्या (16 डिसेंबर) सुनावणी होणार आहे.
वाचा : श्रध्दाची 'ती' महत्त्वाची गोष्ट मिळवण्यासाठी वडिलांची धडपड
तसेच आफताब याला ड्रग्सचे व्यसन होते. या तपासाचा महत्त्वाचा भाग असलेले आफताबचे आई-वडील अद्याप कुठे आहेत याचा थांगपत्ता पोलिसांना लागलेला नसून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.आफताफचे आई-वडील गेली अठरा वर्ष वसईत राहत होते. मात्र अचानक दिवाळीच्या आधी त्यांनी घर खाली केले त्यामुळे आफ़ताबच्या आई-वडिलांना आफ़ताबने केलेल्या क्रूर कृत्याची माहिती असावी असा संशय पोलीस वर्तवत आहेत. आता पोलीस श्रद्धा ड्रग्स कोणाला विकत होती आणि कोणाकडून खरेदी करत होती याचा देखील तपास करण्याची शक्यता आहे. तसेच श्रद्धा आणि आफताबचे मित्र-मैत्रिणींची दिल्ली पोलीस अधिकाधिक तपास करून माहिती जाणून घेणार आहेत.
तसेच या हत्येनंतर श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर पत्रकार परिषदेत घेत म्हणाले, “माझी मुलगी श्रद्धा वालकर हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना अत्यंत दु:ख झालं आहे. हे दु:ख आम्ही कधीच विसरू शकणार नाही. माझी प्रकृती थोडी खराब असून मी शक्य होईल, तेवढंच तुमच्याशी बोलणार आहे. आतापर्यंत दिल्ली पोलीस व वसई पोलीस यांच्याकडून संयुक्त तपास व्यवस्थितपणे सुरू आहे.”