Shraddha Walker Case : श्रद्धा वालकर (shraddha walker) हत्या प्रकरणात आफताब पुनावालाने (Aaftab Poonawala) स्वतःचा गुन्हा कबूल केला असला तरी हत्येचं रहस्य कायम आहे. श्रद्धा (shraddha walker details) हत्या प्रकरणी आफताब सध्या तुरुंगात आहे. श्रद्धा हत्या प्रकरणी रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. आता देखील चौकशी दरम्यान आफताबने मोठा खुलासा केला आहे. (Shrdhha Wallker case)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफताबने श्रद्धाच्या मोबाईलबद्दल सांगितलं आहे. श्रद्धाच्या मोबाईलचं शेवटचं लोकशन 18 आणि 19 मे रोजी  मेहरौलीतील छतरतुर येथील असल्याचं समोर येत आहे. पण अद्याप श्रद्धा हत्या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा म्हणजे तिचा मोबाईल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. (shraddha walker age)


आफाबने सांगितल्यानुसार, तो जेव्हा मुंबईत आला होता, तेव्हा त्याने श्रद्धाचा मोबाईल रस्त्यात फेकला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये आफताबने जुना फोन OLX वर विकून त्याचं नंबरचा सिमकार्ड घेतल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी आफताबचा मोबाईल जप्त केला आहे. (shraddha walker on instagram)


आफताब चौकशी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे. श्रद्धा हत्याकांडात मुंबई पोलिसांनी योग्यवेळी कारवाई केली असती, तर आफताबच्या भाड्याच्या घरातील फ्रीजमध्ये श्रद्धाचं डोकं आणि धड सापडलं असतं. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी श्रद्धा हत्या प्रकरणी महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात अडचणी येत आहेत.  (aftab instagram)


दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी आफताबला चौकशीसाठी बोलावलं होतं. तेव्हाच जर योग्य कारवाई करण्यात आली असती तर आफताब श्रद्धाचं शीर लपवू शकला नसता. त्याला अवयवांची विल्हेवाट लावण्यासाठी वेळ मिळाला असल्याचं देखील दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. 


महत्त्वाचं म्हणजे चौकशी दरम्यान आफताबने जे  पोलिसांना सांगितलं, त्याचं गोष्टी आरोपीने पॉलिग्राफ आणि नार्को तपासात देखील सांगितलं आहे. आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे करुन वेगवेळ्या ठिकाणी फेकले. पण अद्याप पोलिसांना श्रद्धाचं शीर सापडलेलं नाही.  


श्रद्धाच्या बँक खात्याची पोलिसांना मिळाली माहिती


पोलिसांना श्रद्धाच्या बँक खात्याची माहितीही मिळाली आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने 18 मे रोजी खात्यातून एकाच वेळी 50 हजार रुपये आणि दुसऱ्यांदा 4,000 रुपये स्वतःच्या खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर केले होते. (shraddha walker latest news)


श्रद्धाची हत्या केल्यानंतर काय म्हणाला आफताब
श्रद्धाची हत्या (shraddha walker story) करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही...  'आफताह म्हणाला श्रद्धाच्या हत्या प्रकरणात फाशी झाली तरी हरकत नाही. स्वर्गात गेल्यानंतर मला आणखी अप्सरा भेटतील.'  असं देखील आफताब चौकशी दरम्यान म्हणाला. 


आफताच्या या गुन्ह्यानंतर संपूर्ण देशात वातावरण तापलं आहे. आफताबला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे आफताबला त्याने केलेल्या गुन्ह्याची कोणतीही खंत नाही. तुरुंगात (Tihar Jail) देखील तो टेन्शन फ्री आयुष्य जगत आहे. (shraddha walkar news latest)