Shraddha murder case : श्रद्धा वालकर (Shraddha Walker) केसमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दररोज उलघडत चाललेल्या या मर्डर मिस्ट्रीबाबत (Mystery) नवनवीन खुलासे होत असल्याचं पहायला मिळतंय. श्रद्धा आणि तिचा बॉयफ्रेंड आफताब (Aftab Poonawalla) दिल्लीतील मेहरौली भागात लिव्ह इन पार्टनर म्हणून राहत होते. लग्नासाठी तगादा लावल्यामुळे आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. एवढंच नाही तर तिचे 35 तुकडे देखील केले आणि फ्रिजमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवलं. अंगावर काटा आणणाऱ्या प्रकरणातील आरोपी आफताफबाबत लोकं गुगलवर पाहा सर्च करत आहेत. (Shraddhas killer Aftab on Google search See what is being searched now  marathi news shraddha )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येकाला विचारात पडणाऱ्या या प्रकरणातील आरोपी आफताफबाबत त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटपासून ते त्याच्या धर्मापर्यंत लोकांनी त्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी गुगल ट्रेंडमध्ये होता यावरून लक्षात येतं की सर्वसामान्य माणसालाही याबद्दल जाणून घ्यायचं आहे.   


Dexeter या वेब सीरिजमध्ये त्याने अशा प्रकारचा खून करण्याची माहिती घेतली जात असल्याचं बोललं जात आहे. गुगल ट्रेंडमध्ये श्रद्धा वालकर इन्स्टाग्राम, श्रद्धा वालकर फेसबूक, आफताब पूनावाला फेसबूक, Dexeter असं मोठ्या प्रमाणात सर्च केलं जात आहे. दिल्लीच्या लोकांनी सर्वाधिक दोघांबद्दलची माहिती जाणून घेतली आहे. महत्त्वाचं म्हणजे आफताफ Cast असंही सर्च करण्यात आलं आहे. 




दरम्यान, आजची युवा पिढी प्रेमामध्ये अडकली जात आहे, नेटवर डेटिंग अॅपवर ओळख झाल्यावर तरूण- तरूणी एकमेकांना डेट करत आहेत. मात्र श्रद्धाचं प्रकरण समोर आल्यावर भयभयीत वातावरण निर्माण झालं आहे.