वाद सोडवण्यासाठी श्री श्री रविशंकर अयोध्येत
रविशंकर यांच्या या भेटीवर आता रामजन्मभूमी न्यासाच्या पदाधिका-यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अयोध्या : अयोध्येतल्या रामजन्मभूमीच्या वादावार कोर्टाबाहेर तोडगा काढण्यासाठी अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आज अयोध्येत येत आहेत. पण रविशंकर यांच्या या भेटीवर आता रामजन्मभूमी न्यासाच्या पदाधिका-यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
श्री श्री यांच्या मध्यस्थीला मात्र विरोध
आतापर्यंत केलेल्या त्यागाचा विचार करता रामजन्मभूमी न्यासाच्या पदाधिका-यांव्यतिरिक्त कुणीही या वादात मध्यस्थी किंवा लुडबूड करू नये असं न्यायाचे पदाधिकारी रामविलास वेदान्ती यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीचा प्रचार असल्याचा आरोप
तर बाबरी मशीदीच्या जागेवर मशीच बांधण्य़ाची मागणी करणारे मूळ याचिकाकर्ते मोहम्मद इक्बाल अन्सारी यांनी रवीशंकर यांचा अयोध्या दौरा म्हणजे निवडणुकीचा प्रचार असल्याचा आरोप केलाय. आज सकाळी श्रीश्री रवीशंकर अयोध्येत जाऊन रामजन्मभूमी वादातल्या प्रमुख पक्षकारांशी चर्चा करणार आहेत.