`बीफ`च्या मुद्द्यावरून एकमेकांशी भिडले दोन मुख्यमंत्री!
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या हे सोशल वेबसाईट ट्विटरवर एकमेकाशी भिडलेले दिसत आहेत.
मुंबई : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या हे सोशल वेबसाईट ट्विटरवर एकमेकाशी भिडलेले दिसत आहेत.
काय म्हटलंय योगी आदित्यनाथांनी...
भाजपच्या योगी आदित्यनाथांनी एका रॅलीत बोलताना काँग्रेसचे सिद्धरमैय्या यांच्या 'हिंदू' असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं... 'जर ते हिंदू आहेत तर कर्नाटकात अजूनही कत्तलखाना का सुरू आहेत' असं त्यांनी म्हटलं होतं. 'आम्ही जेव्हा कर्नाटकात सत्तेत होतो तेव्हा गोहत्या रोखणारा कायदा लागू केला होता. काँग्रेस सरकार सत्तेत येताच हा कायदा रद्द केला' असंही त्यांनी म्हटलंय.
सिद्धरमैय्या यांचं जोरदार प्रत्युत्तर
यावर, सिद्धरमैय्या यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 'अनेक हिंदूही बीफ खातात... मला वाटरलं तर मीही बीफ खाणार... कुणी बीफ खावं की न खावं हे सांगणारे आदित्यनाथ कोण? आम्हाला उपदेश देण्यापूर्वी त्यांनी गोवधशाळांवर स्वामी विवेकानंदांचं विचार वाचावेत' असं सिद्धरमैय्या यांनी ट्विटरवर म्हटलंय.
'आम्हाला गो संरक्षणाचे धडे देणाऱ्या योगींनी स्वत: अधी गायी चरायला नेल्यात का? मी स्वत: गायी पाळल्यात आणि त्यांचा गोबरही साफ केलाय. त्यांना या मुद्द्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही' असं म्हणत सिद्धरमैय्या यांनी आपला राग व्यक्त केलाय.