गंगटोक : सिक्किममध्ये सीमेवर भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण आहे. चीनकडून सतत धमक्या दिल्या जात आहे. चीनमधील प्रसार माध्यमं देखील रोज भारत विरोधी बोलत आहेत. भारताला सिक्कीममधून बाजुला न झाल्यास चीन 'सिक्किमच्या स्वतंत्रतेचं समर्थन करेल' अशी देखील धमकी दिली जात होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या प्रसार माध्यमातून भारताला धमकी दिली जात आहे. पण सिक्किमवर मात्र याचा कोणताही परिणात झालेला दिसत नाही आहे. 1975 मध्ये सिक्कीम भारताचं राज्य बनलं. चीनची नजर जेव्हा सिक्किमवर पडली तेव्हा तेथील लोकांनीच चीनला चांगलंच उत्तर दिलं. सिक्कीमचे लोकं भारताच्या बाजुने उभे राहिले.


चीनच्या सीमेवर सुरु असलेल्या वादानंतर ही सिक्कीममध्ये १५ ऑगस्ट स्वंतत्र दिवसाची जोरदार तयारी सुरु आहे. लोकांमध्ये खास उत्साह आहे. शाळा, सरकारी कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी जय्यत तयारी सुरु आहे.