सराफा बाजारात सोन्याचे दर स्थिर, चांदीचे दर वाढले
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याचे दर ३०,४५० रुपयांवर स्थिर राहिला. औद्योगिक मागणीमुळे चांदीच्या दरात १२५ रुपयांनी वाढून ४०,७०० रुपये प्रति किलोवर पोहोचले.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याचे दर ३०,४५० रुपयांवर स्थिर राहिला. औद्योगिक मागणीमुळे चांदीच्या दरात १२५ रुपयांनी वाढून ४०,७०० रुपये प्रति किलोवर पोहोचले.
सिंगापूरमध्ये चांदीचे दर ०.४७ टक्क्यांनी वाढून १७.०७ डॉलर प्रति औंस आणि सोन्याचे दर ०.२१ टक्क्यांनी वाढून १,२८३.५० डॉलर प्रति औंसवर बंद झाला.
दिल्लीमध्ये चांदीच्या दरात १२५ रुपयांची वाढ होत ते ४०,७०० रुपये प्रति किलो होते. ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेचे सोन्याचे दर अनुक्रमे ३०,४५० आणि ३०,३०० रुपये इतके होते. सध्या लग्नसराईचा मोसम असल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झालीये.