नवी दिल्ली : दिल्लीच्या सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या दरात १०० रुपयांची घट होत ते प्रतिकिलो ४१,४०० रुपयांवर पोहोचले. चांदीच्या दरात घसरण झाली असली तरी मात्र सोन्याचे दर स्थिर राहिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी दिल्लीत चांदीचे दर १०० रुपयांनी कमी होत प्रति किलो ४१,४००वर पोहोचले. दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रति तोळा ३०,८५० आणि ३०,७०० रुपयांवर बंद झाले. 


याआधी शनिवारच्या सत्रात सोन्याच्या दरात ५० रुपयांची घसरण झाली होती.