Simple One Scooter | 13 राज्यांमध्ये 15 ऑगस्टला लॉंच होणार सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर
बंगळूरूची इलेक्ट्रिक वाहन स्टार्ट-अप कंपनी सिंपल एनर्जीसुद्धा आपली पहिली ई-स्कूटर लॉंच करण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : ओलासोबतच आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात येण्याच्या तयारीत आहे. बंगळूरूची इलेक्ट्रिक वाहन स्टार्ट-अप कंपनी सिंपल एनर्जीसुद्धा आपली पहिली ई-स्कूटर लॉंच करण्याच्या तयारीत आहे.15 ऑगस्ट रोजी बंगळूरूमध्ये या स्कूटरची लॉंचिंग होणार आहे. 15 ऑगस्टपासूनच ई-स्कूटरसाठी बुकिंग सुरू होणार आहे. पहिल्या फेजमध्ये 13 राज्यांमध्ये बुकिंग सुरू करण्याची योजना आहे.
पहिल्या फेजमध्ये 13 राज्यांमध्ये ई-स्कूटर लॉंच केली जाणार आहे. त्यामध्ये कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, दिल्ली, राजस्थान, गोवा, उत्तरप्रदेश, गुजरात आणि पंजाबचा सामावेश आहे. सिंपल एनर्जीने म्हटले आहे की, तसेच कंपनी ई-स्कूटरचा व्यवसाय वाढवण्यासाठी पुढील दोन वर्षात 350 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
अनेक शहरांमधून मिळताय बुकिंगसाठी अर्ज
आधी याची सुरूवात फक्त बंगळुरू, चेन्नई आणि हैद्राबादमध्ये होणार होती. परंतु तामिळनाडू येथील प्लॅंटने ई-स्कूटरच्या प्रोडक्शनची क्षमता 10 लाख रुपयांपर्यंत पोहचवल्याने इतर शहरांध्येही लॉंच केले जाणार आहे.
सिंपल वन ई स्कूटरची किंमत 1.10 ते 1.20 लाखापर्यंत असू शकते. 4.8 kWh लिथियम आयनची बॅटरी असणार आहे. स्कूटर इको मोडवर 240 किलोमीटरच्या रेंज देऊ शकते. या स्कूटरची बॅटरी वेगळी काढून चार्ज करता येऊ शकते. कमाल गती 100 किलोमीटर प्रति तास इतकी आहे.