नवी दिल्ली: बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायक मिका सिंग याला गुरुवारी दुबई पोलिसांनी ताब्यात घेतले. मिका सिंग दुबईत एका कार्यक्रमासाठी गेला आहे. याठिकाणी एका तरुणीने त्याच्याविरोधात छेड काढल्याची तक्रार पोलिसांत केली. यानंतर मिका सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला बूर दुबई पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. याठिकाणी चौकशी केल्यानंतर मिकाची रवानगी अबुधाबी येथील कारागृहात करण्यात आलीय.



— ANI (@ANI) December 6, 2018


सूत्रांच्या माहितीनुसार, मिकाविरोधात तक्रार दाखल करणारी तरुणी ब्राझीलीयन असून ती १७ वर्षांची आहे. मिकाने या मुलीला मोबाईलवर आक्षेपार्ह फोटो पाठवले होते. या तक्रारीनंतर पोलिसांनी एका बारमधून मिकाला ताब्यात घेतल्याचे समजते. यापूर्वीही मिकाला महिलांशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी कारवाईला सामोरे जावे लागले होते. २००६ साली भरपार्टीत आयटम गर्ल राखी सावंतचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याचे प्रकरण गाजले होते.