Rito Riba Internet Sensation: रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल 13' (Indian Idol 13)  सुरू झाला आहे. या शोमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक पाहायला मिळताय. पण यादरम्यान एक गायकही आला, ज्याचा ऑडिशनचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो चर्चेत आला. अरुणाचल प्रदेशचा रिटो रिबाही (Rito Riba) 'इंडियन आयडॉल 13'मध्ये ऑडिशन देण्यासाठी आला होता, पण त्याची निवड होऊ शकली नाही. पण त्यानंतर तो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. त्यानी गायलेली गाणी लोकांना खूप आवडत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिटो रिबा (Rito Riba) 'इंडियन आयडॉल 13' मध्ये आल्यापासून सतत चर्चेत आहे. त्याच्या ऑडिशनची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये तो 'तू मेरी हीर' गाणे गाताना दिसत आहे. रिटोच्या या गाण्यावर लोक  प्रतिक्रिया देत आहेत. रिटोचे हे गाणे लोकांना खूप आवडले आहेत.


नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी यांनी रिटो रिबाऐवजी विनीत सिंगची निवड केली. लोकांचे म्हणणे आहे की याचे एकमेव कारण म्हणजे सर्वजण विनीतला आधीपासूनच ओळखत होते. याचा फायदा विनीतला झाला. त्याच्यामुळे रिटोची निवड झाली नाही, तर रिटो विनीतपेक्षा लाखपट चांगला गातो असं लोकं म्हणत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Rito Riba (@rito.96)


रिटो रिबा हा अरुणाचल प्रदेशचा रहिवासी आहे. रिटोला गायनात करिअर करायचे आहे. पण रिटो याची इंडियन आयडॉलमध्ये निवड होऊ शकली नाही. पण त्याची फॅन फॉलोइंग वाढत आहे. रिटोचे हे गाणे ऐकल्यानंतर लोक त्याला पुढचा अरिजित सिंग म्हणत आहेत. याशिवाय लोक त्याच्या गाण्यांवर इन्स्टाग्रामवर रील्सही बनवत आहेत.