Single Cigarette Ban: धुम्रपान करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, `Single` सिगरेट विक्रीवर येणार बंदी?
Sale of Loose Cigarette in India: देशात सिंगल म्हणजे सुट्ट्या सिगरेटवर बंदी येण्याची शक्यता, भारतात दरवर्षी जवळपास 3.5 लाख लोकांचा धुम्रपानामुळे (smoking) मृत्यू होत असल्याचा अहवाल
Single Cigarette Ban in India: देशात लवकरच सिंगल सिगरेट म्हणजे सुट्ट्या सिगरेटवर विक्रीवर (Single Cigarette Sale) बंदी येण्याची शक्यता आहे. संसदेच्या स्थायी समितीने (Standing Committee of Parliament) सुट्टी सिगरेट विक्रीवर बंदी आणण्याची शिफारस केली आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या (Tobacco Products) सेवनावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. समितीने विमानतळावरचा स्मोमिंग झोन (Smoking Zone) बंद करण्याबाबतही शिफारस केली आहे. 3 वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने ई - सिगरेटवर (e-cigarettes) बंदी आणली होती.
दरवर्षी सिगरेटमुळे 3.5 लाख लोकांचा मृत्यू
तंबाखू आणि दारुमुळे कँसरचा (cancer) धोका वाढतो. भारतात दरवर्षी जवळपास 3.5 लाख लोकांचा धुम्रपानामुळे (smoking) मृत्यू होत असल्याचा अहवाल आहे. सिंगल सिगरेटवर बंदी आणणल्यास सिगरेट पिणाऱ्यांची संख्या कमी होईल, असं समितीने म्हटलं आहे. सिंगल सिगरेट विक्रीवर बंदी घातल्यास हा निर्णय महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक ठरू शकतो, असं समितीचं म्हणणं आहे.
तंखाबू उत्पादनावर GST वाढवावा - WHO
भारत सरकारने तंखाबू उत्पादनांवर 75 टक्के GST लावावा अशी सूचना WHO केली आहे. सध्या सिगरेटवर 55 टक्के, बीडीवर 22 टक्के, तर स्मोकलेस तंबाखूवर 64 टक्के जीएसटी आकारला जातो. जीएसटीच्या माध्यमातून कररचनेत बदल करण्यात आला असला तरी तंबाखूजन्य पदार्थांवरील कर (Tax on tobacco products) वाढवण्यात आला नसल्याचं समितीने म्हटलं आहे.
कर वाढवल्याने विक्रीवर परिणाम होईल
समितीने दिलेल्या अहवालानुसार बीडीमागे 1 रुपया आणि सिगरेटमागे 12 रुपयांची वाढ करण्यात यावी. तर स्मोक फ्री सिगरेटवर (Smoke Free Cigarettes) 90 टक्के कर वाढवला जावा. यामुळे 416 अरब रुपयांचा महसूल मिळ शकतो. शिवाय, बिडी विक्रीत 48 टक्के, सिगरेट विक्रीत 61 टक्के, आणि तंबाखू विक्रीत 25 टक्के घट येऊन शकते.
हे ही वाचा : आताची मोठी बातमी! देशात पुन्हा एकदा नोटबंदी? 2 हजारांची नोट बंद होणार?
सिगरेटवर विक्रीवरचे काय आहेत नियम
1 - सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढण्यावर बंदी आहे. नियम तोडल्यास 200 रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. हॉटेल, रेस्टोरंट, चित्रपटगृह, मॉल या ठिकाणी 60 X 30 चे NO Smoking चे बोर्ड लावणं अनिवार्य आहे.
2- तंबाखू उत्पादनांच्या जाहीरातीवर बंदी आहे. तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री करणाऱ्या दुकानदारांना 60 X 45 च्या बोर्डवर कँसरविषयी जागरुकता करणाऱ्या सूचना देणं आवश्यक आहे. असं न केल्यास 1 हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.
3 - शाळा, कॉलेज आणि युनिव्हर्सिटीच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला बंदी आहे, नियमांचं उल्लघंन केल्यास 200 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.
4 - 18 वर्षांखालील मुलांना सिगरेट विकून शकत नाहीत. विकल्यास आर्थिक दंड आणि तुरुंगवास अशा दोन्ही शिक्षा एकत्रित होऊ शकते.