अभिमानास्पद! शिरीषा बांदल अंतराळात झेपावली
ब्रॅन्सन यांच्या ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’ कंपनीच्या व्हीएसस युनिटी नावाच्या अंतराळयानाने न्यू मेक्सिकोतून उड्डाण
मुंबई : अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन स्वत:च्या अंतराळ यानातून अंतराळात फेरफटका मारून परतले आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात धाडसी मोहिमेत भारतीय वंशाची शिरिषा बांदला त्यांच्या सहकाऱ्यांपैकी एक होती. अंतराळात जाणारी ती भारतीय वंशाची तिसरी महिला ठरली आहे.
ब्रॅन्सन यांच्या ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’ कंपनीच्या व्हीएसस युनिटी नावाच्या अंतराळयानाने न्यू मेक्सिकोतून उड्डाण केलं होतं. लहानपणी आकाशात पाहून तारे बघायचो आता मोठे झाल्यावर आकाशातून सुंदर अतिसुंदर अशी पृथ्वी पाहत असल्याचं रिचर्ड यांनी म्हटलं आहे.
याआधी 'या' व्यक्तींचा अंतराळ प्रवास
याआधी रशियाच्या यानातून भारताच्या विंग कमांडर राकेश शर्मा यांनी अंतराळ प्रवास केला होता. ते पहिले भारतीय अंतराळवीर होते. यानंतर हरयाणातील करनालमध्ये जन्मलेल्या आणि नंतर अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेल्या कल्पना चावला हिने अमेरिकेच्या यानातून अंतराळ प्रवास केला. पण पृथ्वीवर परतताना यानाचा स्फोट झाला. या दुर्घटनेत कल्पना चावला आणि अन्य सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला. यानंतर भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्सने हिने अमेरिकेच्या यानातून अंतराळ प्रवास केला. आता भारतात जन्मलेली शिरीषा बांदला अंतराळ प्रवास करणार आहे.
कोण आहे शिरिषा बांदल?
शिरीषा बांदला हिचा जन्म भारतातील आंध्र प्रदेशमध्ये झाला. ती जेमतेम चार वर्षांची असताना घरच्यांसोबत अमेरिकेत गेली आणि तिथेच स्थायिक झाली. पहिल्यांदाच अंतराळाचा प्रवास करणार असलेल्या शिरीषावर राकेश शर्मा यांचा प्रभाव आहे. शिरीषा बांदला हिने अमेरिकेतील पड्र्यू विद्यापीठातून एमबीए केले. तसेच २०११ मध्ये तिने एअरोस्पेस, विमान उड्डाण प्रशिक्षण आणि अंतराळ अभियांत्रिकी शाखेतले शिक्षण पूर्ण केले. बुद्धिमत्ता आणि कौशल्य तपासून शिरीषा बांदला हिची अंतराळ मोहिमेसाठी निवड झाली आहे. शिरीषा ज्या मोहिमेत सहभागी होत आहे ती खासगी अंतराळ मोहीम आहे.