मुंबई : 'सीतेचं अपहरण रावणानं नाही, तर रामानं केलं' असं आम्ही नाही तर गुजरात बोर्डाची बारावीचं संस्कृतचं पुस्तक म्हणतंय. 'इंट्रोडक्शन टु संस्कृत लिट्रेचर' या पुस्तकाच्या १०६ क्रमांकाच्या पानावर केलेल्या उल्लेखानुसार, 'जेव्हा रामानं सीतेचं अपहरण केलं तेव्हा लक्ष्मणनं रामाशी मार्मिक संवाद साधला होता'... या ओळींमध्ये 'रामा'च्या ऐवजी 'रावण' असा उल्लेख असायला हवा होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात बोर्ड ऑफ स्कूल टेक्स्टबुक्सचे अध्यक्ष डॉ. नितीन पेठानी यांना याबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा, भाषांतर करताना झालेल्या छोट्या चुकीमुळे तसं पुस्तकात छापलं गेल्याचं त्यांनी म्हटलंय. 


संस्कृतचे प्रसिद्ध कवि कालिदास यांची रचना असलेल्या 'रघुवंशम'मधील या ओळी आहेत. पण गुजरातच्या विद्यार्थ्यांनाच बोर्डाची ही चूक सुधारावी लागेल, असं दिसतंय.