Bridal glow juice: लग्न प्रत्येकासाठी खूप खास असत , आपल्या लग्नात आपण सर्वात सुंदर हटके दिसावं अशी प्रत्येकीची इच्छा असते, यासाठी लग्न ठरल्यापासून होईपर्यंत आपण अनेक  उपाय करत असतो, पार्लरमध्ये जाऊन विविध ट्रीटमेंट्स घेतो यासाठी भरपूर पैसे  खर्च होतात . पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि आता पार्लरमध्ये जाण्याची काहीच गरज नाहीये घरच्या घरी हे सौंदर्य तुम्हाला मिळू शकत. हो एक ज्यूस आहे जो पिऊन तुम्हीसुद्धा ब्रायडल ग्लो मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया 'या' खास मॅजिक ब्रायडल ग्लो ज्यूस विषयी... (how to get clear flawless skin)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण घेत असलेल्या जेवणातून पुरेश्या पौष्टिक गोष्टी न मिळाल्याने बऱ्याचदा त्याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. काही क्रीम्स किंवा कॉस्मेटिक्स वापरून आपण स्किन आणखी खराब करून टाकतो मग अश्यावेळी काही नैसर्गिक गोष्टीच्या मदतीने तुम्ही चमकदार नितळ आणि सुंदर त्वचा मिळवू शकता.  (Pre bridal juice for glowing skin) .


सुंदर- चमकदार त्वचेसाठी खास ज्यूस..


सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर nuttyovernutritionn या पेजवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे यात काही विशेष भाज्या आणि फळं वापरून  हा ज्यूस कसा बनवायचा हि रेसिपी देण्यात आलेय. 


हा ज्यूस तुम्ही रोज नित्यनेमाने रिकाम्यापोटी घ्यायचा आहे, लग्नाआधी काही दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे, शिवाय या ज्यूसमध्ये इतर फळ आणि भाज्या आहेत त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हा ज्यूस नंबर एक आहे यात शंका च  नाही.


मॅजिक ब्रायडल ग्लो ज्यूस कसा बनवाल 


साहित्य 


  1. * बीट

  2. * दुधी भोपळा 

  3. * काकडी 

  4. * सफरचंद 

  5. * गाजर 

  6. * आवळा 

  7. * कढीपत्ता 

  8. * अर्धा कप पाणी 



कृती 


  • * दुधी काकडी आणि गाजर यांची साल काढून घ्या आणि यांच्यासकट इतर फळांचे छोटे तुकडे करून घ्या

  • *  चिरलेल्या या भाज्या आणि फळ मिक्सरच्या भांड्यात टाका आणि थोडं पाणी टाकून ज्यूस करून घ्या 

  • * हा ज्यूस वस्त्रगाळ करून घ्या वरून थोडी काळीमिरी पावडर घालून सकाळी रिकाम्या पोटी हा ज्यूस प्या. 


 जवळपास एक महिना आधी हा उपाय करून पाहा आणि लग्नात ब्रायडल ग्लो मिरवायला सज्ज व्हा.