नवी दिल्ली : कोरोना काळात बहुतांश लोकांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसायातही तोटा झाला. परंतु जर तुम्हाला कमी गुंतवणूकीत चांगल्या कमाईचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी चांगला पर्याय सुचवत आहोत. हा व्यवसाय 25 हजार रुपये वार्षिक खर्च करून सुरू करू शकता. हा व्यवसाय आहे मत्स पालन! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मत्स पालन


मत्स  पालन असा व्यवसाय आहे की, आपल्याला खर्चानंतर चांगला नफा मिळतो. सरकार देखील मत्स पालनाला प्रोत्साहन देत आहे. छत्तीसगड सरकारने तर मत्स पालनाला कृषीच्या बरोबरीचा दर्जा दिला आहे. 



मत्स पालनाच्या टेक्निक
मत्स पालनात Biofloc Technique चा वापर केला जातो. हे एका बॅक्टेरियाचे नाव आहे. यामध्ये 10-15 लीटरच्या टाकीमध्ये मासे सोडले जातात. या टाक्यांमध्ये पाणी भरणे, काढणे, ऑक्सिजन देणे आदींची खास व्यवस्था असते. बायोफ्लॉक बॅक्टेरिया माशांचा मैला प्रोटीनमध्ये बदलतो. ज्याला मासे पुन्हा खातात. त्यामुळे एक तृतीयांश खाद्य वाचते. पाण्यात घाण होत नाही. एका टाकीसाठी 7.5 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तुम्ही तलावात मासे पालन करूनही कमाई करू शकता.


मत्स पालनाची बायोफ्लॉक टेक्निक सद्या खूप प्रसिद्ध होत आहे. या पद्धतीचा वापर केल्यास कमी जागेत मत्सपालन करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. अनेक राज्यात या व्यवसायासाठी सरकारी अनुदानही दिले जाते.