मुंबई : कोरोना काळात एका खासगी नोकरीवर अवलंबून राहणे आता कठीण झाले आहे. महामारी दरम्यान अनेक लोकांनी आपली नोकरी गमावली आहे. तुमच्याकडे 2 लाखाची बचत रक्कम असेल तर, तुम्ही छोटा बिझनेस सुरू करू शकता. जर तुम्ही तुमच्या नोकरीला कंटाळला असाल आणि स्वतःचा व्यवसाय करू इच्छित असाल तर, दरमहा लाखो रुपये कमावू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पापड बनवण्याचा उद्योग
पापड बनवण्याचे काम करण्यासाठी 2 लाख रुपयांच्या भांडवलाची गरज पडू शकते. नॅशनल स्मॉल इंडस्टीर कॉर्पोरेशनच्या एका प्रोजेक्ट रिपोर्टनुसार तुम्ही 4 लाख रुपयांपर्यंत मुद्रा लोन घेऊ शकता.


रिपोर्टच्यानुसार 6 लाख रुपयांच्या रक्कमेवर 30 हजार किलोचे पापड तयार होऊ शकतात. यामध्ये फिक्स कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल दोन्ही सामिल आहेत. रिपोर्टच्या मते फिक्स्ड कॅपिटलमध्ये 2 मशीन, पॅकॅजिंग मशीन, इक्विपमेंट सारखे खर्च सामिल आहेत. वर्किंग कॅपिटलमध्ये स्टाफ तीन महिने सॅलरी, तीन महिने लागणारे रॉ मटेरिअल आणि युटिलीट प्रो़डक्टचा खर्च सामिल आहे. याशिवाय भाडे, वीजबिल, पाणी टेलिफोनचा खर्च देखील सामिल आहे.



250 वर्ग फुटाची जमीन गरजेची
हा उद्योग सुरू करण्यासाटी कमीत कमी 250 स्वेअरफूट जागेची गरज आहे. तुमच्याकडे जमीन नसेल तर तुम्ही भाडे देऊन जमीन घेऊ शकता.


कमाई
एकदा का तुमचा प्रोडक्ट बनला तो होलसेल मार्केटमध्ये विकावा लागेल. याशिवाय तुम्ही रिटेल दुकानदार, किराणा स्टोअर, सुपर मार्केटशी संपर्क करून सेल वाढवू शकता. पापडच्या उद्योगात तुम्ही 5 लाख लावल्यास 1 लाख रुपये दरमहा मिळू शकतात. सर्व खर्च जाऊन तुम्हाला दरमहा 35 ते 40 हजारापर्यंत नफा मिळू शकतो.