नवी दिल्ली : केंद्र सरकारने पीपीएफ, किसान विकास पत्र आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे यांच्यासह अनेक लघुबचत योजनांच्या व्याजदरात 0.2 टक्क्यांची कपात करण्यात आलीय. यामुळे सर्वसामान्य नागरिकाला छोट्या बचतीतून मिळणा-या व्याजावर एकप्रकारे कात्री लागणार आहे. 


लघुबचत व्याजात 0.2 टक्क्यांनी कपात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या निर्णयानुसार एनएससी आणि पीपीएफसारख्या लघुबचत योजनांवरील व्याज दरांमध्ये जानेवारी-मार्च तिमाहीत 0.2 टक्क्यांनी कपात केलीय. मागील वर्षांच्या एप्रिल महिन्यापासून व्याजदरात ही कपात करण्या येत आहे. 


ज्येष्ठांच्या बचत व्याजदर कायम


दरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेवरील व्याजदर 8.3 टक्के कायम ठेवण्यात आलाय. त्यांना दर तिमाहीप्रमाणे व्याज मिळणार आहे. दरम्यान बचत खात्यावरील वार्षिक व्याजदर मात्र सरकारने जैसे थे म्हणजेच 4 टक्केच ठेवलंय.