`हे` फोटो तुमच्या Smartphone गॅलरीत असणे आवश्यक, अन्यथा उद्भवू शकते मोठी समस्या
कॅमेरा ही तर फोनमध्ये मिळालेली अशी गोष्ट आहे, ज्यांनी लोकांचं जगणं सोप्पं केलं आहे.
मुंबई : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्यातील अविभाज्या घटक आहे. आज आपल्या सर्वांच्या हातात स्मार्टफोन आहे आणि आपली जवळपास सर्व कामे आपल्या स्मार्टफोनवरच होत असतात. असे म्हटले जाते की, एका स्मार्टफोनमध्ये अनेक अशा गोष्टी करण्याची ताकद किंवा फीचर्स आहेत, ज्यासाठी आपल्याला वेगवेगळे उपकरणं वापरण्याची गरज नाही. यामध्ये उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर, अलार्म, कॅलेंडर, कॅलक्यूलेटर, कॅमेरा इत्यादींचा समावेश आहे.
कॅमेरा ही तर फोनमध्ये मिळालेली अशी गोष्ट आहे, ज्यांनी लोकांचं जगणं सोप्पं केलं आहे. नवीन कॅमेरा विकत घ्यायचा आणि त्याला हाताळायचं, यापेक्षा फोनमध्येच आता असे काही कॅमेराचे फीचर्स येऊ लागले आहेत, जे आपल्याला चांगल्या कॅमेरासारखे फोटो देतात.
एवढंच काय तर आपल्याला फोनमध्ये हे फोटो काढल्यानंतर ठेवायला स्पेस किंवा मेमरी मिळते, ज्यामुळे फोटो जतन करुन ठेवण्यासाठी देखील आपल्याला त्याचा फायदा होतो.
आपल्या सर्वांच्याच फोनला चांगला कॅमेरा आहे, ज्यामध्ये आपण चांगले फोटो काढून सेव्ह करतो. तुमच्या देखील गॅलरीत अनेक भिन्न प्रकारचे चित्र आहेत, परंतु आज आम्ही अशाच काही महत्वाच्या चित्रांबद्दल बोलत आहोत. जे आपल्या सर्व फोनमध्ये असले पाहिजेत.
आधार कार्ड : आपले आधार कार्ड ही आपली ओळख आहे. काहीवेळा असे होऊ शकते की, तुमच्याकडे तुमच्या आधार कार्डची हार्ड कॉपी नसते. अशा परिस्थितीत, फोनमध्ये त्याची डिजिटल कॉपी किंवा हार्ड कॉपी फोटो ठेवणे हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे तुम्हाला कधीही उपयोगी पडलं तर तुम्ही फोनमधून त्याची प्रत घेऊ शकता.
कोविड 19 चे लसीकरण प्रमाणपत्र: आजच्या काळात कदाचित सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज, जे आमच्या फोनमध्ये असले पाहिजे, ते आहे लसीकरण प्रमाणपत्र. जर तुम्ही कोविड 19 काळात कोरोनावर मात करण्यासाठी बनवलेल्या लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तर तुमचे प्रमाणपत्र तुमच्या फोनमध्ये नक्कीच ठेवा.
पॅन कार्ड: आपले आधार कार्ड जितके महत्त्वाचे आहे तितकेच आपले पॅन कार्ड देखील महत्त्वाचे आहे. महत्त्वाचा ओळखीचा पुरावा, पॅन कार्डची प्रतही आमच्या फोनमध्ये असावी. जर तुमच्याकडे हार्ड कॉपी नसेल, तर त्याची डिजिटल कॉपी तुम्हाला खूप उपयोगी पडू शकते.
ड्रायव्हिंग लायसन्स: तुम्ही गाडी चालवत असाल तर घरातून बाहेर पडताना तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे की नाही हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कधीही DL नेण्यास विसरलात, तर त्याची डिजिटल प्रत तुमच्या फोनमध्ये ठेवणे आवश्यक आहे. डिजीलॉकर ऍप आणि एम-परिवाह ऍप हे डिजिटल कॉपी जतन करण्यासाठी काही महत्त्वाचे ऍप आहेत.