नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. जगातील सध्या सर्वात श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेले बिल गेट्स यांच्यासोबतचा हा फोटो आहे. पण या फोटोसोबत स्मृती इराणी यांनी जे कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे ते चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. स्मृती इराणी यांच्या या फोटोवर एकता कपूर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मृती इराणी यांनी या फोटो सोबत म्हटलं आहे की, "विचार करत आहे, पूर्ण शिक्षण घेतलं नाही, पुढे काय करायचे?' स्मृती इराणींच्या या कॅप्शनवर लगेचच प्रोड्यूसर एकता कपूर यांनी म्हटलं की, बॉस! तुलसी अजूनही लक्षात आहे. कृपया परत या...!', यावर लगेचच स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया दिली की, 'सेवा आधी मॅडम. हे सांगा रवीसोबत पुस्तक वाचलं का?'



स्मृती इराणी यांनी या कॅप्शनच्या माध्यामातून त्यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांना आणि ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. २०१४ मध्ये मोदी सरकारच्या पहिल्या कार्य़काळात त्यांनी मानव विकास संसाधन मंत्री बनवण्यात आलं होतं. पण विरोधकांनी त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दुसरीकडे बिल गेट्स देखील कॉलेज ड्रॉप आउट आहेत. पण आज दोघे ही यशस्वी आहेत.


राजकारणात येण्याआधी स्मृती इराणी यांनी टीव्ही सिरीअलमधून प्रसिद्धी मिळवली होती. क्योंकि सास भी कभी बहू थी सिरीअलमध्ये त्यांनी तुलसीची भूमिका केली होती. आज ही त्यांची ही भूमिका अनेकांना आठवते. एकता कपूरची ही सिरीअल होती. जी ८ वर्ष चालली. सिरीअलनंतर राजकारणात देखील स्मृती इराणी यांनी आज मोठं यश मिळवलं आहे.