नवी दिल्ली : भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांचे भावोजी रॉबर्ट वाड्रा यांच्यावर पुन्हा भ्रष्टाराचे आरोप करत हल्लाबोल केला आहे. बेहिशेबी संपत्ती प्रकरणात जी कागदपत्रे समोर आली आहेत त्यानुसार भ्रष्टाचारामध्ये भावोजी सोबत मेहुणा देखील सहभागी असल्याचे समोर आल्याचे इराणी यांनी म्हटले आहे. संस्थात्मक भ्रष्टाचार ही 70  वर्षांपासूनची कॉंग्रेसची देण असल्याचेही त्या म्हणाले. पण गेल्या 24 तासात माध्यमांतून जे तथ्य समोर येत आहेत त्यानुसार गांधी-वाड्रा परिवाराने भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाल्याचेही त्या म्हणाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एचएल पाहवा नावाच्या व्यक्तीकडे ईडीने घातलेल्या छाप्यात राहुल गांधींशी व्यवहाराची कागदपत्रे सापडल्याचे वृत्त माध्यमांतील सुत्रांनी दिल्याचेही इराणी म्हणाल्या.   जमिन खरेदीची जी कागदपत्रे समोर आली आहेत त्यानुसार एचएल पाहवाशी राहुल गांधींचे आर्थिक संबध असल्याचे स्मृती म्हणाल्या.  जमिन घोटाळ्यामध्ये पैशांचे ट्रेल केवळ रॉबर्ट वाड्रा यांच्यापर्यंतच पोहोचले नाही तर भावोजी सोबत मेहुणा देखील यात सहभागी असल्याचे त्या म्हणाल्या. राहुल गांधींना याचे उत्तर द्यावे लागेल असेही त्यांनी सांगितले.


एचएल पाहवा याच्याकडे जमीन खरेदी व्यवहारासाठी पैसे नव्हते. राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांच्यासाठी जमीन खरेदी  करण्यासाठी सीसी थंपी यांनी 50 कोटी जास्त दिल्याचे समोर आले असेही स्मृती इराणी म्हणाल्या. यूपीए सरकारमध्ये सुरक्षा आणि पेट्रोलियम संबंधित करारामध्ये संजय भंडारी आणि सीसी थंपी याचे कनेक्शन समोर आले आहे.