पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचं रविवारी निधन झालं. ५ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. चार वेळा गोव्याचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं आहे. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. पण कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांना श्रद्धांजली दिली. शासकीय आणि लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटच्या श्वासापर्य़ंत त्यांनी देशाची सेवा केली. प्रकृती ठीक नसताना देखील आराम न करता त्यांनी आपली जबाबदारी बजावली. संपूर्ण देशाने त्यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला. नेता असावा तर मनोहर पर्रिकर यांच्या सारखाच अशी प्रत्येकाची भावना आहे. केंद्र सरकारने आज एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. 



केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहिली. या दरम्यान त्या भावूक देखील झाल्या. अश्रृ पुसताना त्यांचे फोटो समोर आले आहेत.


मिरामार बीचवर मनोहर पर्रिकर यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. य़ाच ठिकाणी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बंडोदकर यांचं देखील स्मारक आहे.