गुजरात (Gujarat) आम आदमी पार्टी (आप)  प्रमुख गोपाल इटालिया (gopal italia) यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या आई हीराबेन (Heeraben Modi) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपने (BJP) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 'आप'चे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या सांगण्यावरूनच पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या आईचा अपमान करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (smriti irani) यांनी म्हटले आहे. हे शब्द इटालियाचे असले तरी आदेश केजरीवाल यांनी दिल्याचे स्मृती म्हणाल्या. केजरीवाल यांनी गुजरातच्या भूमीवर पंतप्रधानांच्या आईबाबत अशा प्रकारे भाष्य करून दाखवावं, गुजरातची जनता त्यांना उत्तर देईल, असे आव्हानही ईराणी यांनी दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोपाल इटालिया (Gopal Italia) यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये इटालिया पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आईविषयी शिवराळ भाषेत वक्तव्य करताना दिसत आहे. भाजप (BJP) नेते अमित मालवीय यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. याशिवाय बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते परेश रावल (paresh rawal) यांनीही गोपाल इटालिया यांच्यावर निशाणा साधला आहे. परेश रावल यांनी ट्विट करत, "जो कोणी वृद्ध आईला शिवीगाळ करतो तो पाटीदार अजिबात असू शकत नाही," असे म्हटलं आहे.


याप्रकरणी स्मृती इराणी (smriti irani) यांनी पत्रकार परिषद घेत केजरीवाल यांच्यासह आपवर निशाणा साधला आहे. "आपचा नेता 100 वर्षीय महिलेचा अपमान करतो कारण त्या आईने एका मुलाला जन्म दिला ज्याने देशाचे आशीर्वाद मिळवून पंतप्रधानाचे कर्तव्य पार पाडले. अरविंद केजरीवाल यांना माहित आहे की त्यांचे गुजरातचे नेते हिंदू समाजाचा अपमान करतात, मंदिरातील स्त्रीच्या भूमिकेवर मर्यादा ओलांडून टिका करतात आणि आता या नेत्याने पंतप्रधानांच्या 100 वर्षांच्या वृद्ध आईचा अपमान केला आहे कारण त्यांना आपले राजकीय अस्तित्व दाखवायचे आहे,'' असे इराणी म्हणाल्या.


"गोपाल इटालिया जे काही बोलले ते अरविंद केजरीवाल यांच्या सांगण्यावरूनच बोलले, असा स्मृती यांनी अनेकदा पुनरुच्चार केला. "अरविंद केजरीवाल यांच्या सूचनेशिवाय कोणताही प्रवक्ता, लोकप्रतिनिधी एक शब्दही उच्चारत नाही. गुजरातच्या नेत्याचे हे शब्द जरी तुम्हाला त्याचे वाटत असले तरी आदेश केजरीवालांचा आहे," असेही स्मृती इराणी म्हणाल्या.