2024 चा सर्वोत्कृष्ट क्राइम-थ्रिलर चित्रपट, सायको किलरची थरकाप उडवणारी स्टोरी...OTT वर नंबर वन

Top Crime Thriller Movie On OTT : ओटीटी प्लॅटफॉर्मवर 2024 वर्षातील सर्वोत्कृष्ट क्राइम-थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झालाय आणि पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटात सायको किलरची अंगाववर काटा आणणारी स्टोरी दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट ओटीटीवर टॉप ट्रेंडिंग यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

राजीव कासले | Sep 21, 2024, 19:53 PM IST
1/8

2024 चा सर्वोत्कृष्ट क्राइम-थ्रिलर चित्रपट, सायको किलरची थरकाप उडवणारी स्टोरी...OTT वर नंबर वन

2/8

ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक क्राईम, थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यातच नुकताच एक चित्रपट प्रदर्षित झाला असून या चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला आयएमडीबीवर तगडी रेटिंग देण्यात आली आहे. घरबसल्या तुम्हा हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटाचं नाव आहे 'सेक्टर 36'. (फोटो आभार: IMDb)

3/8

'सेक्टर 36' हा चित्रपट 2006 मध्ये देशाला हादरवून टाकणाऱ्या निठारी कांड प्रकरणावर आधारित आहे. या चित्रपटात विक्रांत मेसी, दीपक डोबरियाल, दर्शन जरीवाला या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. 'सेक्टर 36'.ची कहाणी एका सायको किलरवर आधारीत आहे. जो लहान मुलांना आपली शिकार बनवतो. (फोटो आभार: IMDb)

4/8

'सेक्टर 36' या चित्रपटात सायको किलर प्रेम सिंहची भूमिका अभिनेता विक्रांत मेसीने साकारली आहे. प्रेम सिंह एका श्रीमंत उद्योगपतीच्या बंगल्याचा केअर टेकर असतो. उद्योगपती कामाच्या निमित्ताने परदेशात असतो. त्यामुळे बंगलात प्रेम सिंह एकटाच राहात असेत (फोटो आभार YouTube Grab)

5/8

प्रेम सिंह रात्रीच्या वेळेस परिसरातील लहान मुलांचं अपहरण करुन बंगलात आणायचा आणि त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करायचा. मृतदेहाचे तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावली जायची. परिसरात अनेक कुटुंबाने आपली मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात केलेली असते (फोटो आभार: YouTube Grab)

6/8

यादरम्यान या परिसरातील पोलीस स्थानकाचे प्रभारी रामचरण पांडे यांच्या मुलीच्या अपहराणचा प्रयत्न होतो, पण सुदैवाने ती यातून बचावते. मुलगी आपल्या वडिलांना घडलेला प्रकार सांगते. यानंतर रामचलन पांडे सायको किलरच्या शोध घ्यायला सुरुवात करतो. या दरम्यान एकामागोमाग एक धक्कादायक खुलासे होत जातात (फोटो आभार: YouTube Grab)

7/8

सायको किलरच्या भूमिकेत विक्रांत मेसीने दमदार भूमिका केली आहे. तर पोलीस इन्स्पेक्टर रामचरण पांडेची भूमिका साकारणारा अभिनेता दीपक डोबरियालने तोडीसतोड अभिनय केला आहे. चित्रपटातील काही सीन्स इतके भयानक आहेत की अंगावर अक्षरश: काटो येतो. (फोटो आभार: YouTube Grab)

8/8

'सेक्टर 36'  हा चित्रपटा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.  विशेष म्हणजे हा चित्रपट ओटीटीवर टॉप ट्रेंडिंग यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. आयएमडीबीवर या चित्रपटाला 10 पैकी 7,4 रेटिंग देण्यात आली आहे. आदित्य निंबाळकरने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. (फोटो आभार: YouTube Grab)