चेन्नई :  आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी बुधवारी १०० ग्रॅम हेरॉइनसह एका व्यक्तीला अटक केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्यक्तीने कंडोममध्ये हे हेरॉइन लपवले होते. तो कोलंबोला जात होता.  या व्यक्तीने कंडोमध्ये हेरॉइन भरून ते आपल्या लिंगावर परिधान केले होते. सुरक्षा रक्षकांना जेव्हा संशय आला तेव्हा त्यांनी त्याला पकडले. 


टाइम्स ऑफ इंडियाला एका अधिकाऱ्याने सांगितले की तपासात त्या व्यक्तीचा पेल्विस एरिया नॉर्मलपेक्षा मोठा दिसला. त्यावेळी त्याची कसून चौकशी केली तेव्हा लक्षात आले की त्याने कंडोममध्ये हेरॉइन भरली आणि ते कंडोम आपल्या लिंगाला रबर बॅडने बांधले आहे. 


एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी व्यक्ती चेन्नईतील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्टोअरकीपर म्हणून काम करत आहे. हे प्रकरण कस्टम विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.