Snake Attacked Man Climbed Tree To Steal Jackfruit: तुम्ही फळं काढायला झाडावर चढलात आणि तितक्यात तुमच्या पायाला एक मोठा साप वेटोळा मारुन बसला तर? वाचूनच अंगावर काटा आला ना? पण खरंच असं झालं तर भितीने तुमचीही गाळण उडेल याच काही शंकाच नाही. मात्र सोशल मीडियावर जर तर नाही खरोखरच असा प्रकार घडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.


साप दिसतो अन्...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती फणस काढायला झाडावर चढल्याचं दिसत आहे. या व्यक्तीच्या हातात फणस आहे. तर या व्यक्तीच्या पायाला मात्र एक काळ्या रंगाचा साप वेटोळा मारुन बसल्याचं दिसत आहे. मोठे फणस तोडण्यासाठी ही व्यक्ती झाडावर चढण्याचं दिसत आहे. मात्र पुढल्या क्षणी अचानक या व्यक्तीच्या पायाजवळ काहीतरी वळवळल्या सारखं होतं आणि तो खाली पाहतो तर त्याच्या पायाभोवती चक्क एक साप असल्याचं दिसत. मात्र या व्यक्तीच्या पायाजवळ साप असला तरी फणसामुळे त्याला हा साप पहिल्या प्रयत्नात दिसत नाही. नंतर जेव्हा हा साप या व्यक्तीला दिसतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हावभावच बदलतात. 


दुसऱ्या पायाने साप बाजूला करण्याचा प्रयत्न पण...


साप पाहिल्यानंतर ज्या पद्धतीने या व्यक्तीचे हावभाव बदलतात ते पाहूनच त्याला किती भीती वाटली असेल याचा अंदाज बांधता येतो. पायाभोवती साप असल्याचं पाहून या व्यक्तीचे पाय थरथरु लागतात. ही व्यक्ती इतकी घाबरते की तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. या व्यक्तीने घाबरुन हातातील फणसच फेकून दिलं. त्यानंतर दुसऱ्या पायाने या सापाला बाजूला करण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करताना दिसत आहे.  इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे. या व्यक्तीचं पुढे काय झालं यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by (@rk__rofiq__official___04)


मी तिथेच मेलो असतो


या व्हिडीओला दीड लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करुन ही फारच कठीण परिस्थिती निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. अन्य एकाने माझ्याबरोबर असं झालं असतं तरी मी तिथेच हार्ट अटॅकने मेलो असतो असं म्हटलं आहे. अन्य एकाने नक्कीच ही व्यक्ती फणस चोरत असणार असं म्हटलं आहे. बऱ्याच जणांनी ही व्यक्ती अभिनय करत असून हा पाळीव साप असल्याचा दावाही व्हिडीओ पाहून केला आहे. ते काहीही असलं तरी हा व्हिडीओ पाहून नक्कीच अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही हे मात्र खरं.