एर्नाकुलम : केरळमध्ये पुराचं पाणी ओसरत असताना, केरळच्या नागरिकांना आणखी एका भयानक संकटाचा सामना करावा लागतोय. एर्नाकुलममधील संतोष कुमार यांच्या पायाला काही तरी किटक चावल्यासारखं वाटलं, त्यांनी स्थानिक डॉक्टरांना हे सांगितलं. तेथील डॉक्टरांनी त्यांना हळद लावली मात्र त्याबरोबर संतोष कुमार तेथे कोसळले. संतोष कुमार यांना तात्काळ हॉस्पिटलला हलवण्यात आलं, त्यावेळी तेथील डॉक्टरांनी संतोष कुमार यांना सर्पदंश झाल्याचं सांगितलं.


पुराचं पाणी ओसरल्यानंतर सर्प दंशाची ५० प्रकरणं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतोष आता आयसीयूमध्ये आहेत, तेथील डॉक्टरांनी यावर बोलताना सांगितलं की आम्ही सर्पदंशावर मागील ४० वर्षापासून उपचार करत आहोत. पुराचं पाणी ओसरल्यानंतर सर्प दंशाची ५० प्रकरणं समोर आली आहेत. यातील ७० टक्के दंश हे दुर्देवाने कोरडे होते, कोरडे म्हणजे ज्यात सर्प फक्त चावतो, आपलं विष सोडत नाही.


ज्या घरातील पाणी उतरलं आहे, अशा घरात जास्त साप आढळून येत असल्याचं, सुपरिचित सर्प मित्र वावा सुरेशने म्हटलं आहे.


पुण्याहून ५०० अॅन्टी व्हेनम केरळला


पुण्याच्या एका फार्मा कंपनीने ५०० अॅन्टी व्हेनम, सब्सिडीच्या दरात दिले आहेत, त्यापैकी १५० अॅन्टी व्हेनम केरळमध्ये रवाना झाल्या आहेत. केरळमध्ये सर्प दंश झाल्यावर काय करता येईल, त्यांच्या मदतीसाठी एक वेब पेज सुरू करण्यात आलं आहे, ते यापूर्वी सर्पदंश झालेल्या व्यक्तीने सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. तर सर्प मित्रांचे व्हॉटसअॅप नंबर, तसेच विषारी साप कसा ओळखता येईल. याची माहिती देखील या वेबसाईटला देण्यात आली आहे.


पूर ओसरल्यानंतर सर्वात जास्त सर्प दंशाचे बळी


कोचीचे कार्डिओलॉजिस्ट जयदीप मेनन यांनी याविषयी सांगितलं, काश्मीर आणि ओरिसात पूर ओसरल्यानंतर सर्वात जास्त सर्प दंशाचे बळी पडले होते. साप जुलै ते ऑगस्ट महिन्यात अँडी घालतो. कोब्रा ६० अंडी घालतो, सापाची पिलं हे ड्राय बाईट करत नाहीत, अनेक वेळा ते विष सोडतात, त्यामुळे मृत्यू ओढवण्याचं प्रमाण वाढतं.