Snake Viral Video : सोशल मीडियावर साप, अजगर, क्रोबा यांचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर ट्रेंड होतात. साप हा शब्दच ऐकला की भल्या भल्या पैहलवानालाही घाम फुटतो. सापाचा दंश झाला की माणसाचा मृत्यू अटळ असं म्हणतात. वेळीच उपचार मिळाला नाही तर सापाचा हल्ला हा जीवघेणा ठरतो. हा हे विषारी असतात ते माणसांना दंश करतात. महाकाय अजगर पाहून तर श्वास रोखला जातो. बेकरी अख्ख गिळतानाचा अजगराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 


पाहूनच थरकाप उडेल...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सोशल मीडियावर साईट ओपन केल्यावर एका चिमुकलीवर विषारी सापाची नजर असलेला व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ पाहून हृदयाचे ठोके चुकतात. गावांमध्ये साप दृष्टीस पडणे हे काय नवीन नाही. पण सिमेंटच्या घरात अचानक एखादा विषारी साप आपल्या समोर आला तर. कल्पना करुनच भीती वाटते ना. 


अन् चिमकुलीच्या डोळ्यासमोर...



या व्हिडीओमध्ये तुम्हा पाहू शकता एका घराच्या दाराशी असलेल्या भिंतीला विषारी साप अगदी चपकून बसला आहे. फरशीचा रंग आणि सापाचा रंग जवळपास सारखाच असल्याने कोण्याचाही लक्षात येणार नाही तिथे साप आहे ते..थोड्याच वेळात खालून एक चिमुकली आपल्याच धुंदीत वरती येते. तिची नजर त्या सापावर जात नाही. मात्र हा विषारी साप चिमुकलीच्या निशाणावर येतो अन् मग...


दारावर चिमुकली थबकली...


चिमुकलीला दारा येता क्षणी साप घाबरतो आणि मागे सरकतो...आपल्या पायाशी काही तरी हालचाल झाली चिमुकलीने खाली पाहिलं तर साप...ती घाबरली मागे सरकली आणि ओरडत घरात पळून गेली. तिच्या ओरडण्याने सापही घाबरला आणि तो मागे फिरून तिथून निघून गेला. (Snake Viral Video girl come near snake shocking Belgaum maharashtra Video trending Watch now)


हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ती चिमुकली थोडक्यात बचावली आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील बेळगावमधल्या हलगा गावातील असल्याचं म्हटलं जातं आहे. 



उन्हाळा तापतोय त्यामुळे साप अशावेळी अनेक वेळा जमीन तापल्यामुळे बिळाच्या बाहेर येतात. त्यात आता लवकरच मान्सून आगमन होणार आहे. मग पावसाळा सुरु होणार अशावेळीदेखील साप हे बिळातून बाहेर येतात.  त्यामुळे या दिवसात काळजी घेणं गरजेचं आहे.