Snow Leopard on indo hina border : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण काही असे व्हिडीओ ज्यांची चर्चा दूरपपर्यंत होते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये बिबट्या मोकळ्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. मोकळ्या रस्त्यावर दुर्मिळ प्रजातीच्या हिम बिबट्याचा (snow leopard) भारत-चीन सीमेवर (indo china border) दिसला आहे. महत्त्वाचं म्हणजे हिम बिबट्या बर्फाच्छादित भागात आढळतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-चीन सीमेवर  दोन हिम बिबट्या
भारत-चीन सीमेवर सुमनाजवळ दोन हिम बिबट्या दिसले आहेत. याठिकाणी फक्त आणि फक्त भारतीय लष्कर आणि ITBP चे जवान उपस्थित असतात. हे ठिकाण  प्रतिबंधित क्षेत्र देखील आहे. सध्या या दोन बिबट्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 



दुर्मिळ प्रजातीचे दोन हिम बिबट्या


सुमना क्षेत्रात दुर्मिळ प्रजातीचे दोन हिम बिबट्या आढळ्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हिम बिबट्या हा दुर्मिळ प्राणी असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ज्या भागात बिबट्या आढळले आहेत तो सुमना परिसर नंदा देवी राष्ट्रीय उद्यानांतर्गत येतो. (snow leopards in the wild)


सुमना परिसरात वनविभागाकडून हिम बिबट्याचं संरक्षण केलं जातं. वनविभागाकडे हिम बिबट्यांबाबत योग्य माहिती राहावी यासाठी त्यांची वेळोवेळी गणनाही केली जाते. (snow leopard documentary)