नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची लाट अधिक तीव्र झालेय. जम्मू-काश्मीरसह उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये कडाक्याची थंडी आहे. काश्मीरमध्ये पर्यटकांची बर्फात धमाल-मस्ती सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर भारतात आलेली थंडीची लाट अधिकच तीव्र झाली आहे. जम्मू-काश्मीरसह उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजधानी दिल्लीमध्ये पारा आणखी खाली घसरलाय. 


काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरू असून खोऱ्याचा देशाशी संपर्क तुटला असला तरी तिथं गेलेल्या पर्यटकांची मात्र चंगळ झाली आहे. उधमपूर इथं असलेल्या पर्यटकांनी बर्फात धमालमस्ती केली. बर्फाचा गुडघाभर थर साचल्यानं बच्चेकंपनीही आनंद लुटला.