नवी दिल्ली : १९ व्या वर्षी ब्रिटीश आर्मीसोबत काम करणारे पिंगली वेंकैया ऊर्दू आणि जपानी भाषेसहीत अनेक दुस-या भाषांचे जाणकार होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१८९९ ते १९०२ पर्यंत आफ्रिकेत चाललेल्या Anglo-बोर युद्धा दरम्यान पिंगली वेंकैया यांची भेट महात्मा गांधीच्याशी झाली. त्यानंतर ते स्वतंत्रता सेनानी झाली आणि ५० वर्षांपेक्षा अधिक काळ ते महात्मा गांधी यांच्यासोबत राहिले.  १९१६ पासून ते १९२१ पर्यंत म्हणजेच पाच वर्षां दरम्यान पिंगली वेंकैया यांनी ३० देशांच्या राष्ट्रीय ध्वजांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी १९२१ मध्ये Indian National Congress च्या संमेलनात राष्ट्रीय ध्वजाचं आपलं डिझाईन सादर केलं. या डिझाईनमध्ये मुख्यत्वे लाल आणि हिरवा रंग होता. 


ज्यात लाल रंग हिंदू आणि हिरवा रंग मुस्लिम समुदायाचं प्रतिनिधीत्व करत होता. १९३१ मध्ये यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. तिरंगा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्विकारण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. आणि संशोधन करून लाल रंगाच्या जागी केसरी रंग घेण्यात आला. त्यावेळी राष्ट्रीय ध्वजाला स्वराज ध्वज असे संबोधले जात होते. 


२२ जुलै १९४७ ला संविधान सभेत राष्ट्रीय ध्वजाच्या रूपाय याचा स्विकार करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर हाच तिरंगा भारताच्या एकतेचा आणि अखंडतेचा प्रतिक झाला. नंतर नंतर रंग कायम ठेवत चरख्याच्या जागी अशोक चक्राला जागा देण्यात आली.