कानपूर : सध्याची तरुणाई ही सोशल मीडियाशी इतकी जोडली गेलेली आहे की, जणू काही त्यांनी त्याचं व्यसनच लागलं आहे. त्यांना सोशल मीडियावर पाहाणाऱ्या गोष्टींचं इतकं एडिक्शन होऊन जातं की, त्यांना सोशल मीडियावरीर सगळ्याच गोष्टी खऱ्या वाटू लागतात. सोशल मीडियामुळे आपल्याला माहिती मिळते, नवीन लोकांशी ओळख होते हा त्याचा चांगला फायदा आहे. परंतु यामुळे लोकांचे नुकसान देखील वाढत आहे. कारण यामुळे लोकांची सरास फसवणूक होत आहे. अशीच एक घटना कानपूरमधील एका तरुणासोबत घडली. त्याने सोशल मीडियावर घडत असलेल्या गोष्टीवर डोळे बंद करुन विश्वास ठेवला. परंतु जेव्हा त्याचे डोळे उघडले तोपर्यंत फार उशीर झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना कानपुरमधील एका युवकासोबत घडली. त्याचे पुण्यात राहाणाऱ्या एका मुलीसोबत ओळख झाली. ज्यानंतर त्यांची ही मैत्री प्रेमात बदलली आणि त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, ज्यानंतर ही महिला पुण्यावरुन कानपूरला पळून आली.


सुरुवातीला या लग्नासाठी या तरुणाच्या घरातील लोकं तयार नव्हते, परंतु अनेक विनंत्या करुन ते तयार झाले. परंतु त्यानंतर मात्र सगळ्यांना 440 वोल्ट झटका बसला.


काय आणि कसं घडलं?


कानपूरमधील तरुण आणि ही तरुणी इंस्टाग्रामवर भेटले. ज्यानंतर त्यांचं प्रेम जमलं. त्यावेळी ही प्रेमीका सारखं लग्न कर आणि मला इथून घेऊन जा असं, त्या तरुणाला म्हणायची, परंतु त्याने या सगळ्या गोष्टी मस्करीत घेतल्या. ज्यानंतर एक दिवस ही प्रेमीका खरोखर घरातुन पळून या तरुणाकडे आली. ज्यामुळे हा तरुण घाबरला आणि तो या प्रेमिकेला घराबाहेर भेटला. यानंतर त्याने त्याच्या प्रेमिकेला आपल्या मित्राच्या घरी काही काळ ठेवलं आणि आपल्या घरी परतला.


त्यानंतर हा तरुण आपल्या घरच्यांना लग्न करण्यासाठी तयार करु लागला, परंतु त्याच्या घरचे लग्नासाठी तयार नव्हते, ज्यानंतर ही प्रेमिका त्याच्या घरच्यांसोबत भांडू लागली आणि हे प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचलं. ज्यानंतर पोलिसांनी जेव्हा या तरुणीच्या घरच्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला , तेव्हा त्यांना कळलं की, ही प्रेमिका आपला नवरा आणि अडीच वर्षांच्या मुलाला सोडून येथे पळू आली आहे.


हे एकल्यानंतर तो तरुण आणि त्याच्या घरच्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला, ज्यानंतर हे प्रकरण संपूर्ण कानपुरमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.