पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : जीवन जगण्याचा वेग (The pace of life) हा झपाड्याने वाढत आहे. आपणही त्याच बरोबरीने चालत, धावत आहोत. परंतु ऐवढं वेगाने धावाने देखील चांगलं नाही. ज्यात आपल्याला किमान विश्रांती घ्यायला वेळही मिळू नये. आज मोबाईल आणि इंटरनेटचे युग (Mobile and Internet) आहे. प्रत्येकजण येथे व्यस्त दिसतो. आपली गोपनीयता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा (Privacy Freedom of expression) हवाला देत प्रत्येकजण दुसऱ्याची जीभ बंद करताना दिसून येतोय. आता तर मोबाईलसमोर (Mobile trend) तासनतास घालवणे हा ट्रेंडच बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मिडिया आणि आपण
सोशल मिडियावरील फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, ईमेल (Facebook, WhatsApp, Instagram, Email) इत्यादी सोशल मीडियाच्या (media) वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मने (platform) आता लोकांना एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याची गरज नसल्याचचं फर्मान काढलं की काय असं वाटू लागलंय. ज्ञान, मनोरंजन, भावना, सुख-दु:ख (Knowledge, entertainment, emotions, happiness and sorrow) अशा सर्व गरजा तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून (smartphone) पूर्ण करू शकता. पण कुटुंब, समाज, नातेसंबंधांमध्ये भावना, सहानुभूती, संवाद, सहकार्य, स्वीकार, प्रेम (Emotions, empathy, communication, cooperation, acceptance, love in family, society, relationships) यांना विशेष स्थान आहे. हे लक्षात ठेवण्याची गरज निर्माण झालीय. कारण कोणतीही मशीन, भौतिक वस्तू, मोबाईल, संगणक (Machines, physical objects, mobiles, computers) तिची जागा घेऊ शकत नाही.


सर्तक राहणं गरजेचं
बहुसंख्य लोक हे सोशल मिडिया (Social media) या व्यसनाच्या आहारी (Addicted) गेल्याचं दिसून येतोय. डिजिटल जगाच्या जाळ्यात अडकून लोकांनी आपला वेळ आणि नातेसंबंध (Time relationship) गमावू नयेत यासाठी आता प्रत्येकाने सतर्क राहाणे गरजेचं आहे. सोशल मिडियावर क्षणिक आनंद (Momentary happiness on social media) शोधताना तुमच्या आयुष्यातील अनुमोल वेळ वाया जाऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचं आहे. आपण प्रत्येकांनी स्वत:चा वेळ आणि प्रेमाचा वाटा हा आपल्या कुटुंबाना आणि मुलांना द्यायचा असतो. तरच भविष्यात चांगले आणि सक्षम पिढ्या घडवू शकतील.


नात्यांचं डिजिटायझेशन
आपण ज्याला ओळखतो त्यांची आणि आपली भेट झाली असेलचं असं नाही. कारण त्याचं आणि आपलं वेळ आणि परिस्थिती वेगळी असते. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक जण हा व्यस्त असतो. कारण अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात. पण काही वर्षात सोशल मीडियाच्या (Social media) आडून नात्यांचं बिनदिक्कतपणे डिजिटायझेशन (Digitization seamlessly) होत आहे, जे मानवी जीवनासाठी आणि निरोगी समाजासाठी योग्य म्हणता येणार नाही. हे खरे आहे की डिजिटल माध्यमांनी आपले जीवन खूप सोपे केले आहे. माहिती, ज्ञान, नवीन गोष्टी (Information, knowledge, new things) अशा अनेक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. पण आज आपले अज्ञान किंवा इतरांची कॉपी करण्याची सवय, किंवा आणखी काही, हे सर्व आपल्या सर्वात मोठ्या शक्तीला, नातेसंबंधांच्या महत्त्वापुढे उपस्थित आहे.


सोशल मीडियाचा गरजेनुसार वापर
प्रत्येकांची इच्छा असते की इतरांनी त्याची काळजी घ्यावी, आपल्याला समजून घ्याव. पण इतरांच्या बाबतीत अनेकदा तीच व्यक्ती बेफिकीरपणे (unconcerned) वागताना दिसते. म्हणूनच नातं जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंनी समान पुढाकार घेणे गरजेचं आहे. आपण इतरांचा वेळ स्मार्टफोनवर वाया घालवत नाही याची काळजी घेणे गरजेचं आहे. सोशल मीडियाचा (Social media) वापर गरजेनुसार करायला हरकत नाही. यासोबतच नाती, कुटुंब, समाज यांची उपयुक्तता समजून घेण्याची गरज आहे. थोडं बरोबर, पण नात्यांमध्ये प्रेम, संवाद, (love,communication,) थेट उपस्थिती आणि सामाजिकतेची भावना दाखवली पाहिजे, जेणेकरून पडद्यावरील रंगीबेरंगी जग (A colorful world) आणि पडद्याबाहेरचे सामाजिक वास्तव आणि नातेसंबंधांचे महत्त्व यांच्यात समतोल साधता येईल.