मुंबई : आज 19 मार्चला संपूर्ण जग 'जागतिक स्लीप डे' साजरा करीत आहे. झोपेचे महत्त्व सांगण्यासाठी लोक आपआपल्या प्रकारे झोपेचे महत्व सांगत आहेत. कोणी झोपेचे फॅक्टस सांगत आहे, तर कोणी त्याची माहिती शेअर करत आहेत. काही लोकं तर अगदी त्यांच्या भाषेत त्यांच्यासाठी झोपेचं महत्त्व काय आहे? हे खोचकपणे सांगत आहे आणि काही मजेदार मीम्स शेअर करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या दिवशी #वर्ल्ड स्लीपडे इंटरनेटच्या जगात अव्वल स्थानावर आहे.


आज काल 10 कोटीहून अधिक लोकां झोपेच्या समस्येने ग्रस्त आहेत. लोकांना झोप लागत नाही, तेव्हा लोक त्याकडे दुर्लक्ष .पण ही खरोखरच एक चिंतेची बाब आहे. सुमारे 80% लोकांना याबद्दल माहिती नसते आणि त्यामुळे मग, हेल्थ इशू (health issue),मेंटल हेल्थ (Mental health),स्ट्रेस (Stress), डिप्रेशन (Depression), या सारखा गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.


आजचा हा 'जागतिक स्लीप डे' यासाठी साजरा केला जातो कारण लोकांना या सगळ्या गोष्टींची माहिती मिळावी आणि त्यांना त्याबद्दल लोकांना योग्यते मार्गदर्शन मिळावे आणि लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी.


त्यामुळे तुम्हाला ही झोपे संदर्भात काही तक्रारी असतील तर नक्की तज्ञांना सल्ला घ्या.


पाहा काही मजेदार मीम्स