YouTube Play Buttons : यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबूक या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर दररोज लाखो रिल्स आणि व्हिडिओ शेअर केले जातात. तरुण पिढीत रिल्स बनवण्याची सध्या प्रचंड क्रेझ आहे. याचं कारण म्हणजे पैसे. तुमच्या व्हिडिओला जितके जास्त व्ह्यूज तितकी चांगली कमाई. यूट्यूब सोशल मीडियावरचं एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे चांगली कमाई होऊ शकते. असे अनेक कंटेंट क्रिएटर्स आहेत जे YouTube वर लाखोत कमाई करतात. आज अनेक इन्फ्लूएंसरचं युट्यूबवर एक तरी चॅनेल आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किती पद्धतीचे प्ले बटन्स?


किती पैसे मिळतात हे यूट्यूबर्सच्या सब्स्क्राईबर्सची संख्या आणि व्हिडिओला मिळणाऱ्या जाहीराती तसंच किती लोकांनी तो व्हिडिओ पाहिला यावर अवलंबून असतं. जितके जास्त व्ह्यूज तितकी जास्त कमाई असं याचं गणित आहे. यूट्यूबकडून युजर्सना त्यांच्या चॅनेलवर असलेल्या सब्स्क्राईबच्या संख्येवरुन पाच पद्धतीचे रिवार्ड प्ले बटन्स दिले जातात. यात सिल्व्हर प्ले बटन, गोल्डन प्ले बटन, डायमंड प्ले बटन, रुबी प्ले बटन आणि रेड प्लेन बटन यांचा समावेश आहे. या बटनांच्या आधारावर यूट्यूबर्सना पैसे मिळतात. Youtube ने 2010 पासून आपल्या युजर्सने प्ले बटन्स द्यायला सुरुवात केली. याआधी केवळ सिल्व्हर आणि गोल्डन बटन दिले जात होते. पण युजर्सची वाढती संख्या लक्षात घेऊन यूट्यूबकडून पाच पद्धतीचे रिवार्ड बटन्स दिले जाऊ लागले.


सिल्व्हर प्ले बटन : सर्वात आधी यूट्यूबकडून क्रिएटरला सिल्व्हर बटन दिलं जातं. पण यासाठी यूट्यूबवर 1 लाक सब्सक्राईबर्स पूर्ण होणं गरजेचं आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावर सिल्व्हर प्ले बटन दिलं जातं.


गोल्डन प्ले बटन : क्रिएटर्सना दुसरं बटन मिळतं ते गोल्डन प्ले बटन. युट्यूबवर 10 लाख सब्सक्राईबर्स झाल्यावर यूट्यूबकडून गोल्डन बटन दिलं जातं.


डायमंड प्ले बटन : हे तिसरं रिवार्ड प्ले बटन आहे. एखाद्या क्रिएटरच्या चॅनलवर 1 करोड सब्सक्राईब्स टप्पा पूर्ण झाल्यावर डायमंड प्ले बटन दिलं जातं.


रूबी प्ले बटन : हे Youtube कडून दिलं जाणारं चौथं रिवार्ड आहे. चॅनेलवर 5 करोडचा टप्पा पूर्ण झाल्यावर यूट्यूबकडून क्रिएटर्सना रुबी प्ले बटन दिलं जातं.


रेड प्ले बटन : Youtube कडून दिलं जाणारं सर्वात मोठं रिवार्ड म्हणजे रेड प्ले बटन. 100 मिलिअन म्हणजे 10 कोटी सब्सक्राईब्सचा टप्पा पूर्ण झाल्यावर यूट्यूबकडून रेड प्ले बटन देऊन सन्मान केला जातो.


कसं मिळतं प्ले बटन?


युट्यूबकडून कोणत्याही क्रिएटरला प्ले बटन्स पाठवली जात नाहीत. त्यासाठी तुमच्या चॅनेलवर दिलेल्या सब्सक्राईब्सचा टप्पा पूर्ण झाल्यावर प्ले बटन मिळवण्यासाठी यूट्यूबवर अर्ज करावा लागतो. म्हणजे एखाद्या क्रंटेट क्रिएटरच्या यूट्यूब चॅनेलवर एक लाख सब्सक्राईब्स झाले की सिल्व्हर बटनसाठी अर्ज करावा लागतो. यासाठी तुमच्या चॅनेलवरच अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यात तुम्ही त्यांनी विचारलेली संपूर्ण माहिती द्यायाची असते, त्यांनी दिलेल्या अटींची पूर्तता करत प्ले बटन्ससाठी अर्ज करता येतो.


यूट्यबवर कमाई कशी होते?


यूट्यूबर कमाई कशी होते हे ही जाणून घेऊया. एखादा व्हिडिओ पाहाताना मध्ये जितक्या जाहीराती येतात, त्या जाहीरातीच्य माध्यमातून यूट्यूबला पैसे मिळतात, यातला काही हिस्सा यूट्यूबकडून क्रिएटर्सला दिला जातो. म्हणजे यूट्यूबवर एक जाहीरात एक हजार लोकांनी पाहिली तर Youtubeकडून क्रिएटर्सला 100-200 रुपये दिले जातात. ज्यांच्याकडे सिल्व्हर बटन आहे. ते क्रिएटर्स महिन्याला सहज एक ते दोन लाखांपर्यंत कमाई करतात. तर गोल्डन प्ले बटन असल्याच कमाईचा आकडाही वाढतो. जाहीराती, ब्रँड प्रमोशन, ब्रँड स्पॉन्सरशिप, प्रोडक्ट प्लेसमेंट, एफिलिएट मार्केटिंग या माधम्यातून कंटेट क्रिएटर्सना पैसे मिळतात.